Amit Shah Speech: 'देशाची बदनामी करुन सत्तेत येता येणार नाही', अमित शहा यांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींच्या विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक

Amit Shah Criticizes Rahul Gandhi: सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असोत किंवा कोणताही राजकीय पक्ष असो, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताची आणि भारताच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचे समर्थन कोणी करू शकते का?
Amit Shah Criticizes Rahul Gandhi
Amit Shah SpeechDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पुणे: ‘‘काँग्रेस नेते राहुल गांधी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देश, देशातील लोकशाही संस्था आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या विकासाच्या विक्रमांची बदनामी करत आहेत. मात्र, अशा पद्धतीने सत्तेवर येता येणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे,’’ या शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली. तसेच, सत्ता मिळविण्यासाठी त्यांना परदेशात जाण्याऐवजी भारतातील गावांना भेटी द्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.

तळेगाव येथे झालेल्या ‘नॅशनल हेव्ही इंजिनीअरिंग कोऑपरेटिव्ह’च्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हैदराबाद येथे झालेल्या ‘भारत समिट’मध्ये केंद्र सरकारवर झालेल्या टीकेवरून शहा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसचे (Congress) राजकुमार भारत समिट नावाच्या परिषदेत सहभागी होतात आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतविरोधी विचार मांडून देशाची बदनामी करतात. यातून त्यांना सत्तेवर येता येणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांनी परदेशी जाण्याऐवजी गावामध्ये जाण्यास सुरुवात केली, तर ते कदाचित सत्तेवर येऊ शकतात. काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या कामगिरीवर नेतृत्वाला प्रश्न विचारले पाहिजेत, अन्यथा ते आणखी ३० वर्षे सत्तेबाहेरच राहतील.’’

Amit Shah Criticizes Rahul Gandhi
Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

मोदी यांच्या कार्यकाळावर स्तुतिसुमने उधळताना ते म्हणाले, निवडणुकीतील जय-पराजय राजकीय पक्ष व नेत्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते. काँग्रेसला २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे सत्तेची संधी मिळाली होती, त्या काळात १२ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला.

Amit Shah Criticizes Rahul Gandhi
Amit Shah Goa Visit: अमित शहा दोन दिवस गोवा दौऱ्यावर; रविवारी भाजप भवनाचा लोकार्पण सोहळा

सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असोत किंवा कोणताही राजकीय पक्ष असो, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताची आणि भारताच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचे समर्थन कोणी करू शकते का?

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.