Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

BJP Goa Assembly Election Strategy: कदंब पठारावरील भाजप भवनचे उद्‍घाटन आणि पश्‍चिम विभागीय कौन्‍सिलच्‍या बैठकीच्‍या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री १०.४५वा. गोव्‍यात दाखल झाले.
Amit Shah Goa Visit 2026
Goa Assembly ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कदंब पठारावरील भाजप भवनचे उद्‍घाटन आणि पश्‍चिम विभागीय कौन्‍सिलच्‍या बैठकीच्‍या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री १०.४५वा. गोव्‍यात दाखल झाले. शहांच्‍या भेटीमागे भाजप भवनचे उद्‍घाटन आणि पश्‍चिम विभागीय कौन्‍सिलची बैठक ही कारणे सांगितली जात असली, तरी विधानसभा निवडणूक अवघ्‍या सहा महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक, मंत्री, आमदार आणि कोअर गटाशी बैठका घेऊन ते निवडणुकीच्‍या अंतिम रणनितीवर शिक्‍कामोर्तब करणार असल्‍याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

दाबोळी येथे उतरल्‍यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री रमेश तवडकर आदींसह इतर आमदारांनी शहांचे स्वागत केले. त्‍यानंतर रस्‍तेमार्गे दोनापावला येथील ताज होरायझन हॉटेलकडे ते रवाना झाले. तेथे त्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत व इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Amit Shah Goa Visit 2026
Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

निवडून आलेले प्रतिनिधी, वरिष्ठ नेते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी शहा बंद दाराआड चर्चा करणार आहेत. या चर्चेत स्थानिक प्रश्न, मतदारसंघातील राजकीय वातावरण, पक्षाच्या संघटनात्मक अडचणी आणि जनतेतील प्रतिक्रिया याबाबत थेट माहिती घेतली जाऊ शकते. अशा बैठकीतून पक्षाच्या सार्वजनिक संवादात आवश्यक ते बदल, तसेच जनतेशी संपर्क वाढविण्याच्या उपाययोजना निश्चित होण्याची शक्यता आहे. विशेषतः केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे, त्या योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेणे आणि त्यातून पक्षाचा सामाजिक आधार विस्तारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे चित्र आहे.

असा असेल दाैरा...

१ अमित शहा हे रविवारी सकाळी ११ वाजता दोनापावला येथे राज्य व केंद्राच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत अमली पदार्थ नियंत्रण या विषयावर बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता कदंब पठारावरील प्रदेश भाजपच्‍या नव्‍या भाजप भवनाचे त्‍यांच्‍याहस्‍ते उद्‍घाटन होईल.

२ या दौऱ्यात शहा भाजपच्या राज्य संघटनेची स्थिती, सरकारची कामगिरी, पक्षाची निवडणूकपूर्व तयारी तसेच संघटनात्मक पातळीवरील उणिवांचा आढावा घेणार आहेत.

३ शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कोअर गट, मंत्री, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची दिशा स्पष्ट होणार आहे. सोमवारी दुपारनंतर ते दिल्लीला परत जाणार आहेत.

Amit Shah Goa Visit 2026
Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

राज्य सरकारच्या कामगिरीचाही आढावा

शहा यांच्या बैठकीत राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. जनतेपर्यंत सरकारच्या योजना आणि कामगिरी कितपत प्रभावीपणे पोहोचत आहे, याचा आढावा घेताना आवश्यक त्या ठिकाणी धोरणात्मक बदल आणि समन्वयावरही चर्चा होऊ शकते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाची निवडणूक रणनिती आता केवळ मोठ्या सभांपुरती मर्यादित न ठेवता सूक्ष्म पातळीवरील नियोजनावर आधारित करण्याचा प्रयत्न आहे. मतदारसंघ, बूथ आणि स्थानिक पातळीवर संघटनाची ताकद वाढवून निवडणुकीच्या बराच आधीपासून पक्षाची उपस्थिती सातत्याने जाणवत राहावी, यावर भर दिला जाणार आहे.

विरोधकांना उत्तर देण्यासाठी आखणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकार विरोधातील मुद्दे अधिक तीव्रतेने मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणुकीपूर्वीच राजकीय भूमिका आणि प्रचाराचा ‘नरेटिव्ह’ निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सरकारच्या कामगिरीवर विश्वास ठेवतानाच राजकीय गाफीलगिरी होऊ नये, याबाबतही पक्षाच्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला जाऊ शकतो.

Amit Shah Goa Visit 2026
Goa Politics: काँग्रेस-‘आरजी’ नेत्यांची गुप्त बैठक? संभाव्य युतीवर चर्चा; गोव्याची अस्मिता अन् हितसंबंधांवर मंथन

आजच्‍या पत्रकार परिषदेकडे लक्ष: शहा रविवारी दुपारच्‍या सत्रात पत्रकारांशीही संवाद साधतील. त्‍यामुळे पत्रकारांच्‍या प्रश्‍‍नांना ते कशाप्रकारे सामोरे जाणार? याकडे सर्वांचे लागून आहे. सोमवारी पश्चिम विभागीय कौन्‍सिलच्‍या बैठकीसह गोवा पोलिसांच्या राष्ट्रपती पदक पुरस्कार सोहळ्यालाही उपस्थित राहतील.दरम्‍यान, या बैठकीला गोव्‍यासह महाराष्‍ट्र, गुजरात, दादरा–नगरहवेली, दमण आणि दीवचे मुख्‍यमंत्री व अधिकारी उपस्‍थित राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com