Goa Politics: घटनेचा खून करून सावंत सरकारची स्थापना, उल्टा चोर कोतवाल को डांटे म्हणत काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर

Goa Politics: देशभरात पक्षांतर करणाऱ्या भाजपला संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेसने भाजपवर टीका केली.
Amit Patkar, Viriato Fernandes And CM Pramod Sawant
Amit Patkar, Viriato Fernandes And CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Politics

देशाच्या घटनेचा खून करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भाजप सरकारची स्थापना झाली. देशभरात पक्षांतर करणाऱ्या भाजपला संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेसने भाजपवर टीका केली.

उल्टा चोर कोतवाल को डांटे? भाजप देव आणि लोकांच्या जनादेशाचा विश्वासघात केलेल्या देशद्रोही आणि फुटीरतावाद्यांनी भरलेला आहे. विरियातो यांचे आव्हान स्वीकारा आणि खुली चर्चेस तयार व्हा, असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच काही भाजप नेत्यांनी कॉंग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या विधानाचा विपर्यास करुन टाकलेल्या सोशल मीडिया पोस्टच्या मालिकेवर काँग्रेस नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

गेल्या 10 वर्षांच्या भाजपच्या राजवटीत संविधानावर घातलेला घाला, पक्षांतरे, भ्रष्टाचार, महागाई, प्रदूषण, बेरोजगारी यावर बोलूया, असे अमित पाटकर म्हणाले.

तर, गुन्हे, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भाजपने 10 वर्षात गोव्याचा केलेला विनाश यावर बोलूया, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

Amit Patkar, Viriato Fernandes And CM Pramod Sawant
Viriato Fernandes: 'भारतीय संविधान गोव्यावर जबरदस्ती लादलं', काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्याने वांदग

भाजप सरकारने प्रति किलो 175 रुपये आधारभूत किंमत न दिल्याने काजू शेतकरी हवालदील झाले आहेत. संजीवनी साखर कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. भाजपने त्यांना राजकीय आरक्षण न दिल्याने एसटी समाज वैफल्यग्रस्त झाला आहे. यावर चर्चा करुया!, असे केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले.

Amit Patkar, Viriato Fernandes And CM Pramod Sawant
Loksabha Election : काँग्रेस, ‘आप’मुळे ‘इंडिया’ची ताकद वाढली; किमान १२ हजार मताधिक्‍याची अपेक्षा

गोवा हे ड्रग्ज डेस्टिनेशन बनल्याने गोमंतकीय भयभीत झाले आहेत. शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरण झाल्याने गोमंतकीयांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, गेल्या 10 वर्षात भाजपच्या राजवटीत सहकार क्षेत्र कोसळल्याने चिंतेंचे वातावरण आहे.

या सर्व मुद्द्यांवर तसेच भाजपकडून देशाच्या संविधानाला निर्माण झालेला धोका यावर चर्चा करू, असे काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com