Loksabha Election : काँग्रेस, ‘आप’मुळे ‘इंडिया’ची ताकद वाढली; किमान १२ हजार मताधिक्‍याची अपेक्षा

Loksabha Election : भाजपला जवळ असलेले चर्चिल आलेमाव यांचा या निवडणुकीत या पक्षाला फायदा होईल असे सुरूवातीला वाटत होते.
Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak

Loksabha Election :

मडगाव, बाणावली हा कधीच भाजपधार्जिणा मतदारसंघ राहिलेला नाही. उलट प्रत्‍येक निवडणुकीत या मतदारसंघाने भाजपला आपल्‍यापासून दोन हात दूरच ठेवले आहे.

असे असले तरी मतविभागणीच्‍या जोरावर काँग्रेसची मते कमी करण्‍याचे डावपेच या मतदारसंघात यापूर्वी भाजपने खेळले आहेत. मात्र यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्‍यासह इतर समविचारी पक्ष एकत्र आल्‍याने ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार असलेले काँग्रेसचे कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांची ताकद बरीच वाढली आहे.

काँग्रेस, आप, तृणमूल, आणि इतर सर्व पक्ष एकत्र आल्‍याने बाणावलीत ‘इंडिया’ आघाडीच्‍या उमेदवाराला किमान १३ हजार मतांची आघाडी मिळणे सहज शक्‍य आहे, असे मत काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेला गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी व्‍यक्‍त केले.

२०१९च्‍या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ रिंगणात असतानाही काँग्रेसला बाणावली मतदारसंघात १३,१२० एवढी प्रचंड मते मिळाली होती. दुसरीकडे भाजपला केवळ २४१४ मतांवरच समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली आघाडी १०,७०६ एवढी होती.

२०१४च्‍या निवडणुकीत भाजपने फोडाफोडीचा खेळ करत चर्चिल आलेमाव यांना लोकसभा निवडणुकीत उभे केले. त्‍यामुळे बाणावलीत प्रथमच भाजपचे नरेंद्र सावईकर यांना ४४३३ मते घेणे शक्‍य झाले. ‘आप’ आणि चर्चिल हे दोघेही रिंगणात असतानाही काँग्रेसचे आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांना ९४९१ मते प्राप्‍त झाली होती. त्‍यावेळी प्रथमच काँग्रेसची आघाडी ५०५८ एवढी कमी झाली होती.

Loksabha Election
Goa ECI: गोव्यात दारू, ड्रग्ज, पैसा, भेटवस्तूंची खैरात; निवडणूक आयोगाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

चर्चिल जाऊन बसलेत दिल्‍लीत :

भाजपला जवळ असलेले चर्चिल आलेमाव यांचा या निवडणुकीत या पक्षाला फायदा होईल असे सुरूवातीला वाटत होते.

मात्र गोवा फुटबॉल संघटनेतील राजकारणामुळे असेल कदाचित, चर्चिल आलेमाव आणि श्रीनिवास धेंपो यांच्‍यात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कदाचित त्‍यामुळे ऐन निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना चर्चिल दिल्‍लीत गेले आहेत.

बाणावली मतदारसंघ हा किनारपट्टी भाग असलेला मतदारसंघ. या भागात अवैधरीत्‍या चाललेल्‍या पर्यटक व्‍यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास करणे सुरू केले आहे.

त्‍यामुळे या भागातील पर्यटनाच्‍या रक्षणासाठी जो काम करणार, त्‍याच्‍याच बाजूने स्‍थानिक लोक उभे राहतील. कॅ. विरियातो फर्नांडिस हे पर्यावरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते आमच्‍या समस्‍या प्रभावीपणे संसदेत मांडून त्‍यावर उपाय काढू शकतील असे वाटते.

- वॉरन आलेमाव, सामाजिक कार्यकर्ते

बाणावली मतदारसंघात प्रामुख्‍याने जे व्‍यावसायिक आहेत ते मच्‍छीमार, शॅकवाले आणि वॉटर स्‍पोर्टस्‌ चालविणारे आहेत. मात्र आता येथे गोव्‍याबाहेरचे लोक येऊन आमच्‍या तोंडातील घास हिसकावून घेऊ लागले आहेत.

हे जे काय चालले ते पाहिल्‍यास आम्‍ही मूळ बाणावलीकर येथून परागंदा तर होणार नाही ना अशी भीती वाटते. त्‍यामुळे या सर्व प्रश्‍‍नांवर तोडगा काढण्‍याची ताकद ज्‍या उमेदवाराकडे आहे, त्‍यांच्‍याच बाजूने लोक उभे राहतील असे वाटते.

- पेले फर्नांडिस, स्‍थानिक मच्‍छीमार

Loksabha Election
Unseasonal Rain In Goa: नभं उतरु आलं...! गोव्याला अवकाळीने झोडपले, पणजीत पाणी साचले, वीज पुरवठा खंडित

मुख्‍यमंत्र्यांनी घेतली मच्‍छीमारांची भेट

बाणावली मतदारसंघात प्रामुख्‍याने मच्‍छीमारांची वस्‍ती जास्‍त असल्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या समाजातील व्‍यावसायिकांबरोबरच हॉटेल व्‍यावसायिकांचीही भेट घेऊन त्‍यांच्‍याशी चर्चा केली. माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजात पर्रीकर हे यावेळी प्रथमच मैदानात उतरल्‍याचे दिसून आले.

मागच्‍या आठवड्यात भाजप उमेदवार पल्‍लवी धेंपे यांनी या मतदारसंघातील मंदिरे, चर्चेसना भेट देऊन लोकांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. दुसऱ्या बाजूने आम आदमी पक्षाने कॅ. विरियातो यांच्‍यासाठी ठिकठिकाणी कोपरा बैठका घेऊन प्रचार सुरू ठेवला आहे. ‘आरजी’चे रुबर्ट परेरा यांनीही आपला प्रचार बऱ्यापैकी सुरू ठेवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com