Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड-भाजप युतीच्या बातम्या फक्त अफवा', मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना आमदार सरदेसाईंनी सुनावले

vijai sardesai gfp bjp alliance rumors clarification: गोवा फॉरवर्ड आणि भाजप पक्षात युती होणार, अशा आशयाच्या बातम्या पसरल्या जात आहेत. त्या केवळ अफवा आहेत.
vijai sardesai gfp bjp alliance rumors clarification
mla vijai sardesai Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा फॉरवर्ड आणि भाजप पक्षात युती होणार, अशा आशयाच्या बातम्या पसरल्या जात आहेत. त्या केवळ अफवा आहेत. कुणीतरी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम या अफवा पसरवल्या आहेत, असा खुलासा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

‘गोमंतक टीव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत सरदेसाई यांनी, गोव्यातील काँग्रेस पक्षाची वागणूक पाहिल्यास भविष्यात गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षात युती होणे कठीण असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गोवा फॉरवर्ड आणि भाजप यांच्यात युती होणार, अशा बातम्या पसरल्या आहेत.

vijai sardesai gfp bjp alliance rumors clarification
Goa Politics: लोबोंना उमेदवारी देऊन चूक! विश्वासघात करणाऱ्यांना आता नाही प्रवेश- गिरीश चोडणकर

यावर खुलासा करताना सरदेसाई यांनी, ज्या पक्षावर आपण सतत टीका केली आहे आणि जे सरकार गोवेकरांच्या विरोधात काम करत आहे, अशा पक्षाशी आपला पक्ष युती करणारच कसा, असा प्रश्न आपल्या ट्वीट अकाऊंटवरून उपस्थित केला आहे. भाजप सरकारने आणलेला ३९-अ, कोळशामुळे होणारे प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि या सरकारमध्ये शिगेला पोहोचलेला भ्रष्टाचार यांविरोधात आपण प्रत्येक वेळी भाजपचा (BJP) निषेध आणि निंदा केली आहे. अशा भ्रष्टाचारी पक्षाबरोबर गोवा फॉरवर्ड पक्ष जाणारच कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, अलीकडेच दामू नाईक यांनी युतीच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com