Goa Politics: लोबोंना उमेदवारी देऊन चूक! विश्वासघात करणाऱ्यांना आता नाही प्रवेश- गिरीश चोडणकर

Goa Congress: काँग्रेस सोडून गेलेल्या आणि पक्षाचा विश्वासघात केलेल्या नेत्यांचे पुन्हा स्वागत केले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत आज प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेस सोडून गेलेल्या आणि पक्षाचा विश्वासघात केलेल्या नेत्यांचे पुन्हा स्वागत केले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत आज प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांना काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी देणे आमच्यासाठी चूक होती, याचीही कबुली त्यांनी दिली.

राज्यातील पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच जनतेसमोर कोणता कार्यक्रम घेऊन जावा, यावर प्रदेश काँग्रेस समितीची शनिवारी काँग्रेस भवनात बैठक झाली. जनतेसमोर कोणता कार्यक्रम न्यावा, तो क्रांती दिनी म्हणजेच १८ जून रोजी जाहीर केला जाईल, याच अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.

काँग्रेस भवनात प्रभारी ठाकरे आणि सहप्रभारी अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि कार्याध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीविषयी माहिती देताना ठाकरे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष जनतेसमोर कार्यक्रम घेऊन जाणार आहे आणि तो १८ जून रोजी धामधूमीने जाहीर केला जाणार आहे.

Goa Congress
Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

पावसाची शक्यता पाहता हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्याचा विचार आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, गोव्याचे हित जपण्यासाठी पक्ष कटिबद्ध असून, येथील जनतेचे कल्याण, प्रगती आणि विकास यासाठी काम करणे सुरूच ठेवणार आहोत. तसेच संघटनेच्या कामकाजावर आणि पंचायत स्तरावर सर्व ४० मतदारसंघांना बळकट करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेला अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नेत्यांनी पक्षाच्या विविध समित्यांबाबतही चर्चा केली.

दरम्यान, कालच्या बैठकीत प्रदेश काँग्रेसची समिती तयार करण्यावर चर्चा झाली. जर ही समितीच नेमली नाही, तर पक्षाचे काम कसे चालणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्या तयार केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. निंबाळकर विमानतळावर ताटकळत

सह प्रभारी अंजली निंबाळकर या गोव्यात मोपा विमानतळावर सकाळी उतरल्या. पण त्यांना नेण्यासाठी येणारे वाहन विलंबाने आले, तोपर्यंत त्यांना मोपा विमानतळावर काही वेळ ताटकळत बसावे लागले. याविषयी त्यांनी आपल्या समाजमाध्यमांतील ‘एक्स'अकाऊंटवर छायाचित्रही अपलोड केलेले आहेत.

Goa Congress
Goa Monsoon Update: राज्यात मान्सून सक्रिय, हवामान विभागाकडून 10 जूनपर्यंत 'यलो अलर्ट'

युरी-एल्टनचे दर्शन

काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलाबरोबरच ज्या काही प्रचार समिती, जाहीरनामा समिती व इतर समित्या तयार केल्या. त्यातील महत्त्वाची प्रचार समितीची ज्यांच्याकडे धुरा आहे, ते विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता ही जोडी काँग्रेस भवनात आल्याची दिसली. दोघेही परदेश दौऱ्यावर होते, पण एल्टन चार दिवस अगोरच गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर आलेमाव गोव्यात दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com