Karnataka Political Crisis: सिद्धरामय्या देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा सस्पेन्स वाढला

DK Shivakumar Next Karnataka CM: कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून सध्या एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना उधाण आले.
DK Shivakumar & CM CM Siddaramaiah
DK Shivakumar & CM CM Siddaramaiah Dainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka CM Siddaramaiah Resignation: कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून सध्या एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना उधाण आले. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांकडून समजते. या बदल्यात त्यांना राज्यसभेची जागा देण्याची ऑफरही पक्षाकडून देण्यात आली.

या संभाव्य सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुपासून ते थेट दिल्लीपर्यंत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. दिल्लीत सिद्धरामय्या यांनी आपल्या अत्यंत विश्वासू मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची 'ब्रेकफास्ट मीटिंग' बोलावली असून, त्यांनी आपल्या समर्थकांना लवकरच काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावून मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

DK Shivakumar & CM CM Siddaramaiah
Karnataka Islands: 'त्‍या'16 बेटांची मालकी असलेली महसुली कागदपत्रे कर्नाटककडे तयार; कारवारच्या जिल्हा उपायुक्त लक्ष्मी प्रिया यांची कबुली

या संपूर्ण राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा शिवकुमार यांचे समर्थक सातत्याने करत होते.

DK Shivakumar & CM CM Siddaramaiah
Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

आता सिद्धरामय्या सरकारच्या कार्यकाळाची पहिली अडीच वर्षे पूर्ण होत आल्यामुळे शिवकुमार गटाने मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडवर दबाव वाढवला. त्यामुळे जर सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर डी. के. शिवकुमार हेच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या मोठ्या घडामोडींदरम्यान नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची एक गुप्त आणि दीर्घ बैठक पार पडली.

DK Shivakumar & CM CM Siddaramaiah
Karnataka Tiger Death: वाघीणसह 4 बछड्यांचा संशयास्पद मृत्यूने खळबळ! कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे हा केवळ आगामी राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबतचा संवाद असल्याचे सांगत नेतृत्वबदलाबाबत नकार दिला असला, तरी पडद्यामागील चित्र काही वेगळेच सूचक संकेत देत आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून दिल्लीत आणण्यामागे हायकमांडची एक मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेतृत्वाला सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात आणून पक्षाचा देशातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा म्हणून सादर करायचे आहे, जेणेकरुन आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करता येईल.

DK Shivakumar & CM CM Siddaramaiah
Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना

मात्र, मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या या निर्णयामुळे सिद्धरामय्या पूर्णपणे समाधानी नसून त्यांनी यावर विचार करण्यासाठी पक्षाकडे काही वेळ मागितला. आता संपूर्ण देशाचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आणि पुढील बैठकांकडे लागले असून, तिथूनच कर्नाटकच्या (Karnataka) सत्तेचा आणि भविष्याचा खरा फैसला स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com