Goa Politics: 'युती'च्या तोंडावर 'यादी'चा बॉम्ब! "चर्चा सुरू असताना यादी जाहीर करणं धक्कादायक", काँग्रेसच्या भूमिकेवर मनोज परब नाराज

Goa ZP Election: गोवा काँग्रेसने जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (२ डिसेंबर) रोजी जाहीर केलीय.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा काँग्रेसने जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (२ डिसेंबर) रोजी जाहीर केलीय. या यादीत विविध मतदारसंघांसाठी काँग्रेसने उमेदवार निश्चित केले असून, पक्षाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घडामोडीनंतर आरजीपी (Revolutionary Goans Party) चे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस आमच्याशी चर्चा करू, असा शब्द देत होती. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, हे आमच्यासाठी धक्कादायक आहे,” असे परब यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.

Goa Politics
Plantation In Goa: कौतुकास्पद! गोमंतकीयांनी 7 महिन्‍यांत लावली 3.55 लाख रोपटी; ‘एक पेड माँ के नाम’मध्ये उत्स्फूर्त सहभाग

गेल्या काही दिवसांपासून आरजीपी आणि काँग्रेस यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत काँग्रेसने एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय.

गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज उत्तर आणि दक्षिण गोव्यातील निवडक ११ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केली.

उत्तर गोव्यातील ७ उमेदवार निश्चित

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी काँग्रेसने पहिल्या टप्प्यात सात उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यात महिला आणि आरक्षित जागांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

महिला आरक्षण: कळंगुटमधून कार्मेलीना अँजेला फर्नांडिस, रेईश मागोसमधून सोनल माळवणकर आणि चिंबल येथून अ‍ॅड. शेजल कळंगुटकर यांना संधी मिळाली आहे.

Goa Politics
Goa ZP Election: गुंता सुटेना! बैठक झाली तरी यादी जाहीर नाही! काँग्रेस हतबल; भाजपचे उर्वरित उमेदवार होणार जाहीर

आरक्षित गट: ताळगाव (ST) मतदारसंघातून विजू दिवकर, तर केरी (SC) मतदारसंघातून आयुष सीताराम केरकर यांच्या नावाचा समावेश आहे.

इतर महत्त्वाच्या जागा: सुकूर (General) मतदारसंघातून साहिल म्हांद्रेंकर यांना आणि पाळी (OBC) मतदारसंघातून भानुदास दत्ता सोनाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com