Sonali Phogat murder case Dainik Gomantak
मनोरंजन

Sonali Phogat च्या मृत्यूमुळे आर्शी खान घाबरली, म्हणाली- तिच्याकडून पैसे मागितले तर...

सोनाली फोगटच्या अचानक जाण्याने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे, कारण सोनालीच्या मृत्यूनंतर सातत्याने अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Case: बिग बॉस 14 फेम आणि भाजप नेत्या सोनाली फोगटच्या निधनाने तिच्या सर्व चाहत्यांची मनं दुखावली आहेत. सोनाली फोगटच्या अचानक जाण्याने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे, कारण सोनालीच्या मृत्यूनंतर सातत्याने अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणी गोवा पोलिस तपास करत असून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सोनालीच्या मृत्यूवर अभिनेत्री अर्शी खानने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली अर्शी खान?

यापूर्वी सोनाली फोगटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी आली होती, मात्र नंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हत्या आणि कट रचल्याचे सांगत सोनालीचे कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आता बिग बॉसमध्ये सोनालीसोबत दिसलेली अर्शी खाननेही सोनालीला न्याय देण्याची मागणी केली आहे.

एका वृत्त वाहिनीशी केलेल्या संभाषणात अर्शी म्हणाली – 'फक्त बिग बॉसमध्येच नाही तर नंतरही आम्ही दोघींनी नेहमीच एकमेकींना सपोर्ट केला आहे. आम्ही एकमेकींसोबत खूप वेळ घालवला आहे. सोनालिने माझे आईसारखे लाड केले आहेत. ती प्रोटेक्टिव होती.'

रेस्टॉरंटमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी महिला सोनाली फोगट आहे. या व्हिडिओवर अर्शी म्हणाली- 'गेल्या काही दिवसांपासून आम्ही फार कमी बोललो. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर मी खरोखर घाबरली आहे. मला गुन्हेगारांना शिव्या द्याव्या वाटत आहे.'

अर्शी पुढे म्हणाली - 'गुन्हेगार कायद्याच्या नियमांपासून सुटू शकत नाही. मला असे वाटते की मी माझ्या जवळचे कोणीतरी गमावले आहे. मी खूप निराश आणि अस्वस्थ आहे. सोनाली इतकी चांगली व्यक्ती होती की जर गुन्हेगारांनी तिच्याकडे पैस्यांची मागणी केली असती तर तिने ते सहजपणे त्याला दिले असते. मग त्यांना का मारावे लागले? मला खात्री आहे की यामागे काहीतरी मोठे कारण आहे. तिला लवकरच न्याय मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते."

सीसीटीव्ही फुटेजही समोर आले

गोवा पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, ज्यामध्ये सुधीर सांगवान सोनालीला बाटलीतून काहीतरी देताना दिसत आहे, परंतु सोनाली त्याला वारंवार थांबवत आहे, ती पदार्थ पिणे टाळत आहे. आता हा पदार्थ एमडीएमए ड्रग असल्याचा संशय पोलिसांना आहे जो सोनालीला दिला जात आहे.

सोनाली फोगट गोव्यात आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये उतरल्या, ते ‘ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्ट’ हे हणजूण येथील वागातोर किनाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे. हे हॉटेल कॉटेज स्वरूपात असून तारांकित असल्याने हाय प्रोफाईल देशी-विदेशी पर्यटक येथे उतरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

SCROLL FOR NEXT