Shehnaaz Gill Dainik Gomantak
मनोरंजन

Shehnaaz Gill च्या आगामी चित्रपटाचे शूटिंग रखडले

शहनाज तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'होसला रखसाठी' या महिन्यामध्ये चित्रीकरण करणार होती; परंतु सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या धक्क्यातून ती अजून सावरली नसल्यामुळे ही तारीख पुढं ढकलण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) अजूनही तिचा प्रिय मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्या अचानक जण्याने मानसिक धक्क्यात आहे. या टप्प्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे; शहनाज तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाच्या (upcoming Punjabi film) 'होसला रखसाठी' (Honsla Rakh) या महिन्यामध्ये चित्रीकरण करणार होती परंतु या धक्क्यातून ती अजून सावरली नसल्यामुळे ही तारीख पुढं ढकलण्यात येत आहे. अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यानी पत्रकारांशी शी बोलताना दिली.

'होसला रखच्या' निर्मात्यांनी 15 सप्टेंबरला शूटिंगची योजना आखली होती. ते आता या महिन्याच्या अखेरीस तारीख निश्चित करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शहनाज गिलच्या सेटवर परत येण्याची अपेक्षा करत आहेत. निर्माता दिलजीत थिंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शहनाज ही चित्रपटाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तिने शूटमध्ये सहभागी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.

त्यांचे म्हणणे असे होते की, “आम्ही तिच्या बरे होण्याची वाट पाहत आहोत. आम्ही मूळतः 15 सप्टेंबर रोजी लंडनमध्ये गाणे शूट करण्याची योजना आखली होती, परंतु समोर असलेल्या स्पष्ट कारणांमुळे ते होऊ शकले नाही. आम्ही लवकरच नवीन तारीख ठरवणार आहोत, शहनाज चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. मी तिच्या व्यवस्थापकाच्या संपर्कात आहे आणि आशा आहे की ती काही दिवसात आमच्याशी संपर्क साधेल.

तिच्या बऱ्याच सहकाऱ्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे हतबल झाली आहे. 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्ला या अभिनेत्याचे निधन झाले. शहनाज त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती आहे आणि दोघे एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT