गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना राणौत विरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता. ज्यावर सोमवारी सुनावणी झाली. या प्रकरणात कंगना प्रथमच न्यायालयात हजर झाली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, कंगनाने जावेद अख्तरविरुद्ध काउंटर केस दाखल केली आहे. ज्यात तिने जावेद अख्तरवर अनेक मोठे आरोप केले आहेत. कंगना रनौत सोमवारी मुंबईच्या अंधेरी न्यायालयात हजर झाली. तिने प्रतिवादात म्हटले आहे की तिचा न्यायालयावरील विश्वास उडाला आहे.
कंगनाने तिच्या प्रकरणात म्हटले आहे की, जावेद अख्तर यांनी तिला आणि तिची बहीण रंगोली चंदेलला तिच्या सहकलाकाराशी झालेल्या वादाच्या संदर्भात चुकीच्या हेतूने आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी दोन्ही बहिणींना धमकी दिली होती.
कंगनाने आणखी एक आरोप केला की जावेद अख्तर यांनी तिची सार्वजनिक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सहकलाकाराला पाठिंबा देताना त्यांनी कंगनाला लेखी माफी मागण्यास सांगितले. माफी मागितली नाही तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार असल्याची जावेद अख्तर यांनी तिला धमकी दिल्याचा तिसरा आरोप कंगनाने केला.
कंगनाने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, जावेद अख्तर यांनी अनुचित विधाने करून तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आणि मुद्दाम तिच्या विनयशीलतेचा अपमान केला. एवढेच नाही तर त्यांनी गोपनीयतेतही हस्तक्षेप केला. जावेद अख्तर यांच्या या वर्तनामुळे तिला मानसिक छळ सहन करावा लागल्याचा पाचवा आरोप कंगनाने केला आहे.
2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जावेद अख्तर यांनी कंगना रनौतविरुद्ध महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनावर तिची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.