Jawan Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Trailer : 'जवान' ट्रेलर अखेर रिलीज...चाहत्यांची उत्सुकता अखेर शांत

अभिनेता शाहरुख खानच्या जवानची गेल्या काही दिवसांपासुन चाहत्यांना जबरदस्त उत्सुकता लागली होती. ती आता पूर्ण झाली आहे.

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि चाहत्यांच्या प्रतिक्षेचं कारण ठरलेला 'जवान'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असुन चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच रिलीज झालेला जवानचा हा ट्रेलर जरुर पाहा. ट्रेलरमधल्या शाहरुखच्या अॅक्शनची जोरदार चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे.

चाहत्यांची प्रतिक्षा

जवान ट्रेलर रिलीज झाल्यापासून शाहरुख खानच्या मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्ह्यूपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अनेक गाणी आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता किंग खान आणि नयनतारा स्टारर जवानचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खानची अ‍ॅक्शन पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

पठाननंतर शाहरुखचा धमाका

'पठाण'नंतर बॉलिवूडचा बादशाह खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दार ठोठावणार आहे. अॅटली दिग्दर्शित त्याच्या आगामी 'जवान' साठी शाहरुखचे फॅन्स प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाले असून, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शाहरुखच्या चित्रपटाची उत्सुकता

या चित्रपटात किंग खान दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार असून या चित्रपटात त्याच्या चाहत्यांना त्याच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच, त्याच्या मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यामध्ये किंग खानची पूर्णपणे वेगळी शैली पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT