Rituparno Ghosh : 12 राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या ट्रान्सजेंडर दिग्दर्शकाची गोष्ट...बंगाली चित्रपटांना दिली होती नवी ओळख

दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांची आज जन्मदिवस, आज पाहुया या विलक्षण दिग्दर्शकाचा तितकाच विलक्षण प्रवास.
Rituparno Ghosh Birth Anniversary
Rituparno Ghosh Birth Anniversary Dainik Gomantak
Published on
Updated on

Rituparno Ghosh Death Anniversary : तो एक असा अवलिया दिग्दर्शक होता ज्याने आपल्या लैंगिक गुंतागुंतीविषयी उघडपणे सांगितले होते. 12 राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला तो प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आपल्या महिला बनण्याच्या इच्छेबद्दलही उघडपणे बोलायचा. शेवटी त्याने स्वत:ला एक महिलेच्या शरीरात बदललं. बंगाली चित्रपटांना एक नवी दृष्टी देणारा तो महान दिग्दर्शक आज आपल्यात नाही.

आम्ही बोलतोय दिवंगत दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्याबद्दल. मानवी भावनांचा अविष्कार आणि भावनांची गुंतागुत मांडणारा विलक्षण दिग्दर्शकाची गोष्ट जाणु घेऊया त्यांच्या जन्मदिवशी.

ऋतुपर्णो घोष

चित्रपट उद्योगात येऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. मात्र, इथं येऊन स्वत:चा मार्ग तयार करणं सोपं नाही. ज्यांच्या स्वप्नांना खरंच मोठी जिद्द आहे तेच इथल्या अनंत अडचणींना तोंड देऊन आपलं नाव कमावू शकतात.

ऋतुपर्णो घोष हे एक असे दिग्दर्शक होते ज्यांचे चित्रपट नाट्यमय होतेच ;पण त्यांचं आयुष्यही तितकंच नाट्यमय होतं. 

 तर आज जाणुन घेऊया ऋतुपर्णो घोष यांच्याबद्दल ज्यांनी त्यांच्या कलेसाठी स्वतःला पुरुषातून स्त्रीमध्ये बदलले. त्यांनी लहान वयातच अनेक राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते.

जन्म आणि बालपण

ऋतुपर्णो घोष यांचा जन्म 31 ऑगस्ट 1963 रोजी कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुनील घोष डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि चित्रकार होते. त्यामुळेच त्यानेही याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 

ऋतुपर्णो घोष यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे ते महिलांवर केंद्रित होते. अगदी लहान वयातच त्यांनी हे जग सोडले असले तरी त्यांचे चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान आजही स्मरणात आहे.

गुंतागुंतीची लैंगिकता

विशेष म्हणजे ऋतुपर्णो घोष पुरुष असूनही त्यांना स्त्रीसारखे कपडे घालायला आवडायचे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये आपली गुंतागुंतीची लैंगिकता उघडपणे स्वीकारली. 

ऋतुपर्णो घोष यांनी समलैंगिक व्यक्तिमत्त्वाबद्दल कोणताही आढेवेढे न घेता खुलेपणाने सांगितले. LGBTQ वर बोलणारे ते चित्रपटसृष्टीतले पहिले व्यक्ती होते .

शस्त्रक्रियेच दुष्परिणाम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वतःला स्वीकारल्यानंतर ऋतुपर्णो घोष एक पूर्ण महिला बनायचे होते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि हार्मोन थेरपीचाही अवलंब केला. 

शरीरावर केलेल्या हार्मोन थेरेपीमुळे त्यांच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम झाल्यानेच असून 30 मे 2013 रोजी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. घोष यांनी रेनकोट, अबोहमान, दोसर, नोकाडुबी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांना एक कलात्मक चौकट आहे, ज्यांचा अभ्यास आजही केला जातो.

Rituparno Ghosh Birth Anniversary
Mahira Khan : 'रणबीर कपूर'सोबतच्या त्या व्हायरल फोटोनंतर अभिनेत्री माहिरा खान डिप्रेशनमध्ये गेली होती...

दु:खद शेवट

असे म्हटले जायचे की जेव्हा ऋतुपर्णो घोष यांनी महिलांप्रमाणे साडी आणि सलवार-कुर्ता घालण्यास सुरुवात केली तेव्हा लोक त्यांच्यापासून अंतर ठेवू लागले. त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या जवळचे कोणीही नव्हते. 

वेगळ्या प्रकारचा चित्रपट बनवणाऱ्या घोष यांना वयाच्या 49 व्या वर्षी 12 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि बंगाली या तिन्ही भाषांमध्ये चित्रपट केले.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com