Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection: सलमानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

सलमान खानच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection: 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून सलमान खानने त्याच्या चाहत्यांना ईदची भेट दिली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चर्चा बरेच दिवस रंगली होती. सलमान खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

सलमान खानच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, भूमिका चावला, राघव जुयाल, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि विनाली भटनागर मुख्य भूमिकेत आहेत.

sacnilk नुसार, किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे. सध्या हे अंदाजे आकडे असले तरी रात्रीच्या शोनंतर आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, किसी का भाई किसी की जान हा चित्रपट जगभरात 5700 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. अशा स्थितीत भाईजानचा चित्रपट पहिल्याच दिवशी 15 ते 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकतो, असे अनेक विश्लेषकांचे मत आहे.

काही चित्रपट विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सलमान खानच्या फॅन फॉलोइंगनुसार, पहिल्या दिवशी त्याच्या चित्रपटाचे हे कलेक्शन कमी असू शकते, परंतु ईदच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी, किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या कलेक्शनची तुलना करता येते.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. जो सलमान खानच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

SCROLL FOR NEXT