Viral Video: 'तेरी आंख्या का...' 37 हजार फूट उंचीवर विमानात वाजले सपना चौधरीचं गाणं, पाहा धम्माल व्हिडिओ

लोकांचा एक ग्रुप 3000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण करणाऱ्या फ्लाइटमध्ये हरियाणवी गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर नाचत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

लग्नातील मज्जा वेगळीच असते, मग तो लग्नमंडप असो किंवा विमानप्रवास असो, लोक लग्नाचा आनंद घ्यायला विसरत नाहीत. सध्या फ्लाइटमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये, लोकांचा एक ग्रुप 3000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण करणाऱ्या फ्लाइटमध्ये हरियाणवी गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये 'तेरी आंख्या का यो काजल' या प्रसिद्ध गाण्यावर मस्ती करणारे लोक पूर्ण देसी पद्धतीने नाचताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नुकताच अँकर जय करमानी नावाच्या युजरने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये लोक फ्लाइटच्या आत जोरात नाचताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सपना चौधरीचे गाणे 37 हजार फूट उंचीवर हवेत वाजले. हे विमान कतारला जात असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांसाठी संपूर्ण फ्लाइट बुक करण्यात आली होती. जेव्हा गाणे वाजले तेव्हा लोक फ्लाइटमध्ये नाचू लागले आणि लग्नाचे वातावरण तयार केले.

Viral Video
Xiaomi कंपनीला कर्नाटक उच्च न्यायालयाचा झटका, 5,551 कोटी रुपयांच्या जप्तीचे आदेश कायम

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडत आहे. या व्हिडिओला अनेकांनी कमेंट आणि लाईकही केले आहेत. व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

काही दिवसांपूर्वी फ्लाइटचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये फ्लाइट अटेंडंटने फ्लाइटमध्ये गुडघ्यावर बसलेल्या तिच्या मैत्रिणीला प्रपोज केले आहे. या व्हिडिओवर यूजर्सने 'लव्ह इन द एअर' अशी कमेंट केली आहे. या दोन्ही मुलींची काही वर्षांपूर्वी भेट झाली होती. दोघांनी अंगठ्याची देवाणघेवाण केली आणि एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com