IFFI 2021 will explore 75 future young filmmakers Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2021 शोधणार 75 भविष्यातील युवा सिनेकर्मी

इफ्फीने चित्रपटक्षेत्रात धडाडीने आणि प्रतिभेने काम करून इच्छिणाऱ्या तरुण सिनेकर्मीना चित्रपट उद्योगात पाय रोवण्याची संधी दिलेली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय सिनेमा आज एका नव्या वळणावर उभा आहे. व्यावसायिक सिनेमाबरोबर समांतर सिनेमाकडेही हळूहळू दर्शक आकर्षित होऊ लागले आहेत. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर थेट आयुष्याशी भिडणारे, ज्यातऱ्हेचे प्रभावी सिनेमा प्रदर्शित होत आहेत आणि ज्या संख्येने ते पाहिले जात आहेत ते पाहता ही अर्थपूर्ण सिनेमांची लाट हळूहळू प्रेक्षकांची मने जिंकत चालली आहे हे स्पष्ट होत आहे. हल्ली सोशल मीडियावर व्यावसायिक सिनेमाबरोबरच अशातऱ्हेच्या समांतर सिनेमाचीदेखील चर्चा तावातावाने होताना दिसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सिनेमा निर्माण करणारी मंडळी ही बहुशः तरुण असते. ती नव्या अभिनेत्याला संधी देते, ती नोन ॲक्टर्स बरोबर काम करताना कचरत नाही.

यंदाच्या 52 व्या इफ्फीत (IFFI 2021) प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी अशा तरुणाईचा शोध लागलेला असेल. या इफ्फीने चित्रपटक्षेत्रात धडाडीने आणि प्रतिभेने काम करून इच्छिणाऱ्या तरुण सिनेकर्मीना चित्रपट उद्योगात पाय रोवण्याची संधी दिलेली आहे. 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने, माहिती आणि प्रसारण मंत्राच्या सौजन्याने त्यासाठी या उद्देशाने एक विशेष स्पर्धा आयोजित केली होती. यासंबंधी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये तरुण सिनेकर्मीना आवाहन करताना म्हटले होते. ‘युवा सिनेकर्मीनो, ही तुमच्यापैकी 75 जणांना मिळणारी संधी आहे. आम्ही भारतातल्या भविष्यकालीन सर्जनशील मनांचा शोध घेत आहोत. 35 वर्षाखालच्या 75 सर्जनशील मनांचा शोध! ही एक लक्षणीय संधी आहे!’

या स्पर्धेतून निवड झालेल्या युवा-युवतीना चित्रपट उद्योगातील जेष्ठांबरोबर वार्तालाप करण्याची संधी मिळेल शिवाय ते इफ्फीत आयोजित होणाऱ्या मास्टर-क्लासना ते हजेरी लावू शकतील. क्रीडा क्षेत्राप्रमाणेच चित्रपटक्षेत्रातही अशाप्रकारे युवा प्रतिभेला हेरणे हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. 52 व्या इफ्फीत सुरू झालेली ही नवी सुरुवात भारतीय सिनेमाला नवीन प्रतिभावंत मिळवून देईल अशी आशा करायला हरकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT