IFFI 2021 नोंदीसाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

नोव्हेंबर 20 ते 28 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या इफ्फीसाठी अर्ज नोंदणी अगोदरच सुरू झाली.
Vaccination certificate required for IFFI Registration
Vaccination certificate required for IFFI RegistrationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इफ्फीमध्ये (IFFI) प्रतिनिधी नोंदणी करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid Vaccination) घ्यावी लागणार आहे. इफ्फीसाठी इच्छुक उमेदवारांना लसीकरणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जाबरोबर जोडावे लागणार आहे. जनहिताच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. कोरोना (Covid-19) महामारीच्या उद्रेकानंतर ही दुसरा इफ्फी आहे. नोव्हेंबर 20 ते 28 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या इफ्फीसाठी अर्ज नोंदणी अगोदरच सुरू झाली.

Vaccination certificate required for IFFI Registration
IFFI 2021: गोमंतकीय चित्ररसिकांना इफ्फीचे वेध

14 च्या मध्यरात्री अर्ज नोंदणी बंद होईल. वर्चुअल प्लॅटफॉर्मसाठीची नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचा 52 व आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव हायब्रीड पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला तीनशेहून अधिक जगभरातील सिनेमा दाखवण्यात येतील.

गोवा सरकार मनोरंजन सोसायटीने आज इफ्फीची सुरवात, समारोप कार्यक्रमाची आयोजन कंपनी, भाडेपट्टीवर संगणक व इतर काही साधन सुविधांसाठी निविदा खुल्या केल्या. कोरोना महामारीने दिलेल्या आर्थिक धक्क्यातून राज्य अद्याप सवरलेले नाही. ज्यामुळे ईएसजीला देखील खर्च वाचवण्याचे पर्याय शोधत शोधत इफ्फीचे आयोजन करावे लागत आहे.

Vaccination certificate required for IFFI Registration
.. आता 'IFFI महोत्सव' पडणार महागात!

इफ्फीच्या तयारीसाठी विविध कामांच्या निविदा काढल्या आहेत. आतापर्यंत 1602 चित्रपटप्रेमी, समिक्षक व इतर इतरांची नोंद झाले आहेत. इफ्फीसाठी 6हजारपर्यंत नोंदणी होणे अपेक्षित आहे, असे ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com