Comedian Kunal Kamra Slams Vishwa Hindu Parishad
Comedian Kunal Kamra Slams Vishwa Hindu Parishad  Dainik Gomantak
मनोरंजन

Kunal Kamara: शो रद्द केल्यानंतर कोमेडियन कामराचं विश्व हिंदू परिषदेला खरमरीत उत्तर

दैनिक गोमन्तक

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा गुरुग्राममध्ये 17 सप्टेंबर रोजी होणारा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने रद्द केला. त्याने रविवारी एका खुल्या पत्रात उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटनेविरुद्ध लिहिण्याचे आव्हान दिले आणि "गोडसे मुर्दाबाद" असे लिहीले होते.

त्यानंतर शुक्रवारी, हिंदू परिषदेने कामराचा शो रद्द करण्यासाठी गुरुग्रामच्या उपायुक्तांना पत्र सादर केले होते. बजरंग दलाने स्टँड-अप कॉमेडियनवर हिंदू धर्माबद्दल विनोद केल्याचा आरोप करत व्यवस्थापनाकडे तक्रार केली.

(Comedian Kunal Kamra Slams Vishwa Hindu Parishad over Nathuram Godse and Hinduism)

कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी व्यवस्थापनाने शो रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शोच्या आयोजकांनी सांगितले.

यावर पत्रात कुणालने हिंदू परिषदेला फक्त "हिंदू परिषद" असे संबोधले, कारण त्याच्या मते, जगभरातील हिंदूंनी त्यांना त्यांचे "ठेकेदार" बनू दिले नाही. विश्व हिंदू परिषदेने शोच्या आयोजकांना धमक्या का देऊन हा शो रद्द केला असल्याचे कुणाल याचे मत आहे.

पत्रात पुढे तो म्हणाला की, “मी अभिमानाने जय श्री सीता-राम आणि राधा-कृष्ण म्हणू शकतो. तुम्ही खरेच भारतीय असाल तर गोडसे मुर्दाबाद लिहिण्याची हिंमत ठेवा. अन्यथा, आम्ही तुम्हाला हिंदुविरोधी आणि भारतविरोधी समजू' विश्व हिंदू परिषदेला आव्हान देत तो म्हणाला की, 'अशी कोणतीही व्हिडिओ क्लिप परिषदेने दाखवावी ज्यामध्ये मी हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे.'

उपायुक्तांना दिलेल्या पत्रात विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते की, "17 सप्टेंबर 2022 रोजी स्टुडिओ Xo बारमध्ये कुणाल कामरा यांचा एक शो आयोजित करण्यात आला आहे. हा व्यक्ती त्याच्या कॉमेडी शोमध्ये हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवतो. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या कार्यक्रमामुळे गुरुग्राममध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा कार्यक्रम तात्काळ रद्द करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते याचा निषेध करतील."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT