Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

बीग बीं च्या 'झुंड' चित्रपटाचा टीझर झाला लॉन्च, सोमवारी रिलीज होणार 'आया ये झुंड है' गाणं

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

अमिताभ बच्चन यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर माहिती देताना त्यांनी सांगितले की, 'आया है ये झुंड' चित्रपटाचे पहिले गाणे सोमवारी प्रदर्शित होणार आहे. (Amitabh Bachchan's Most Awaited Film Zhund Is All Set To Release)

यासोबतच त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 20 सेकंदांच्या या टीझर व्हिडिओमध्ये दिसून येतं आहे की, त्यांच्या हातात क्रिकेटची बॅट आणि काठ्या घेतलेले काही लोक संघ बनून एका बाजूला जाताना दिसत आहेत. या संघात त्यांच्यासोबत लहान मुले आणि एक मुलगीही दिसत आहे.

हे गाणे सोमवारी रिलीज होणार

या गाण्याचा टीझर व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर करत बिग बींनी म्हटलं की, "पंगा घेणारे रडतच राहतील, जेव्हा झुंड येईल तेव्हा सर्वांची मनं जिंकेल." हे गाणे सोमवार 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. अजय-अतुल या हिट जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले हे गाणे अजयने गायले आहे.

हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार

झुंड हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. जे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी आणि संघ तयार करण्यास प्रोत्साहित करतात. ते स्लर सॉकरचे संस्थापक देखील आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. झुंडची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. जो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. टीझर व्हिडिओची सुरुवात जोरदार संगीताने होते, ज्यावर मुले संगीताच्या बरोबरीने लाकडी दांडक्याने तुटलेल्या कारला मारण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT