मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत ताशेरे ओढले होते. तर मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता शिवसेनने राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं असून मनसे ही भाजपची C टीम असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर शिवसेना प्रवक्त्या (Shiv Sena spokesperson) शीतल म्हात्रे यांनी पलटवार केला आहे. (shivsena criticized on MNS Chief Raj Thackeray)
यावेळी शिवसेना प्रवक्त्या (Shiv Sena spokesperson) शीतल म्हात्रे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेताना, मनसे ही भाजपची C टीम असल्याचे म्हटलं असून त्यांनी, अख्या महाराष्ट्रानं प्रसिद्ध नकलाकार आणि सुपारीबाज मनसे अध्यक्ष याचं भाषण ऐकल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी, राज ठाकरे यांचं हेच भाषण कुठतरी मराठी माणसाच्या मुळावर उठणार असंही म्हणत इंजिनाची दिशा बदलल्याचा टोका लगावला आहे.
तर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपची (BJP) सुपारी घेऊन बोलणे योग्य नाही. त्यांना हे कळायला हवं होतं. तसेच ज्यावेळी आपल्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे होते. याची ही आठवण शीतल म्हात्रे यांनी करवून दिली. तसेच त्यांनी राज्यातील मराठी माणूस एकत्र येत असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले चालले असून ते अख्ख जग बघत आहे. अशा वेळेला असा कंरंटेपणा करून दुघी वाढवू नका. तर ज्या भाजपला सत्तेपासून दुर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्याला खिळ पडू देऊ नका, एवढीच आणची आपल्याला विनंती असल्याचे शिवसेना प्रवक्त्या म्हात्रे यांनी म्हटले आहे.
काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधताना, शिवसेनेला अडीच अडीच वर्षे ठरल्याचा साक्षात्कार झाला होता का? जर तसं ठरलं होतचं मग आमच्याशी किंवा भर सभेत का कधी बोलला का नाहीत? पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi), अमित शाह (Amit Shah) हे भर सभेत मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे ठासून बोलत होते, तेंव्हा का तुम्ही काही बोलला नाहीत? आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय. तेंव्हाच टूम काढली. म्हणे अमित शाहांशी मी एकांतात बोललो होतो. बाहेर का बोलला नाहीत. मुख्यमंत्रीपदाबाबतची गोष्टी तुम्ही चार भिंतीत का केली? असे प्रश्न उपस्थित केले. मात्र याची उत्तरे तुम्ही कधीच दिला नाहीत पण शाह सांगतात की आम्ही असं काही बोललोच नाही.
दरम्यान या भाषणानंतर अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे
कालच्या भाषणावरून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका करताना, लाव रे तो व्हिडीओ नंतर एवढं भाषण कस काय बदललं. एका नोटिशीने एवढं भाषण बदललं हे माहिती नव्हतं. मात्र आम्हाला कितीही नोटिसा आल्या तरी आम्ही घाबरणार नाही. राष्ट्रवादीमुळे (NCP) जातीपातीचे राजकारण सुरू झालं हे त्यांनी याआधी पण म्हटलं आहे, त्यात नवीन काही नाही. असे म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत
तर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, भाजप-शिवसेनेत काय झालं. हे आम्ही बघू. यात तिसऱ्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं बघा. तसेच अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. हे बघावं लागेल. परत आम्हाला वैद्यकीय (Medical) शास्त्राचा अभ्यास करावा लागेल, असे म्हणत अडीच वर्षानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) बोलताहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
जितेंद्र आव्हाड
तसेच जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतना, राज ठाकरे यांचा जागतिक राजकारणाविषयी अभ्यास आहे असं बोललं जातं. पण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल कितपत माहिती आह हे माहित नाही. त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करताना, राष्ट्रवादीमुळे (NCP) जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचे अनेक वेळा म्हटलं आहे. पण त्यांनी जरा या अडीच वर्षात एक तरी दंगल झाल्याचे सांगावे. दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहित नाही. त्यांनी प्रबोधनकारांची 4 ते 5 पुस्तके वाचायला हवी होती, असं म्हटलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.