Narve Ghat Aarti: नार्वे येथे 'घाट आरती' होणारच, आमदारांच्या नेतृत्वात नार्वेवासीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Narve Panchganga River Ghat Aarti: नार्वे येथील पंचगंगा नदी तीरावरील नियोजित घाट आरती प्रकल्पाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पूर्ण पाठिंबा आहे.
Narve Ghat Aarti
Narve Ghat AartiDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: नार्वे येथील पंचगंगा नदी तीरावरील नियोजित घाट आरती प्रकल्पाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पूर्ण पाठिंबा आहे. कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प होणारच, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती नार्वेच्या लोकांनी दिली असून, आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेले वक्तव्य नार्वेच्या लोकांची दिशाभूल करणारे आहे, असे म्हटले आहे.

नार्वेच्या पंचगंगा नदी तीरावरील स्मशानभूमीच्या जागेत यापुढे अंत्यविधी करू देणार नाही, असेही नार्वे येथील नामदेव मालवणकर व अन्य लोकांनी स्पष्ट केले आहे.

Narve Ghat Aarti
Goa Budget 2026: गोव्याचा 'बजेट डे' ठरला! 6 मार्चला मुख्यमंत्री सावंत मांडणार अर्थसंकल्प; सभापती गावकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

नार्वेच्या घाट आरती प्रकल्पावरून निर्माण झालेल्या संभ्रमावरून मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या नेतृत्वाखाली नार्वे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. नंतर सायंकाळी डिचोलीतील पत्रकार परिषदेत सरपंच तुकाराम गावडे आणि संदेश पार्सेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

Narve Ghat Aarti
Goa Air Pollution: गोवावासीयांसाठी धोक्याची घंटा! लोकांचे आयुष्य होणार 2 वर्षांनी कमी; 'हवा प्रदूषणा'मुळे गंभीर स्थिती

स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करा!

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या नेतृत्वाखाली नार्वे येथील ग्रामस्थांच्या गटाने (बुधवारी) सायंकाळी पर्वरी येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली.

कुंभारजुवे मतदारसंघातील लोकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्याची सूचना संबंधित आमदारांना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असेही नार्वेच्या ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com