

राजू नायक
निमली : ‘सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंट’च्या ‘स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्नमेंट’ अहवालातून २०२०-२०२१ दरम्यान देशातील कोविड-१९ रुग्णांच्या मृत्यूंची अधिकृत आकडेवारी आणि प्रत्यक्ष मृत्यूंमध्ये मोठी तफावत समोर आली आहे. या अहवालानुसार भारतातील वास्तविक मृत्यूचे आकडे हे अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहेत.
या अहवालातून असे दिसून येते, की अनेक राज्यांमध्ये वास्तविक मृत्यूचे आकडे अधिकृत आकडेवारीपेक्षा तब्बल ५ ते ३० पटीने जास्त होते. त्यामुळे कोविड-१९ साथीच्या गंभीरतेचे आणि व्यवस्थापनाचे खरे चित्र सर्वांसमोर आले आहे. यातून शासकीय
बेबंदशाहीचे विदारक सत्य दिसून आले असून या अहवालामुळे शासकीय कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली आहेत.
२. राज्यांनुसार मृत्युंमधील तफावत (काही प्रमुख राज्ये)
महाराष्ट्र
अधिकृत : १,४१,५१८
वास्तविक : ४,३०,२९७
३. गुजरात
अधिकृत : १०,११८ मृत्यू
वास्तविक : ३,२४,८६१
४. उत्तर प्रदेश :
अधिकृत : २२,९१५
वास्तविक : ३,३६,३२८
५. बिहार :
अधिकृत : १२,०९६
वास्तविक : २,३२,८६९
६. कर्नाटक :
अधिकृत : ३८,३२७
वास्तविक : २,०२,०००
७. तमिळनाडू :
अधिकृत : ३६,७६५
वास्तविक : २,९४,४३०
८. गोवा
अधिकृत : ३,५२१
वास्तविक : ५,२३६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.