मला यूपीए अध्यक्ष होण्यात रस नाही: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

संयुक्त पुरोगामी आघाडीचा अध्यक्ष होण्यात आपल्याला रस नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) अध्यक्ष होण्यात आपल्याला रस नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मी जबाबदारी घेणार नाही. भाजपविरोधात एकहाती लढा देण्यासाठी काही प्रयत्न झाले, तर मी नक्कीच मदत करण्यास पुढे असेन. तसेच, असे प्रयत्न करण्यापुर्वी नत्यांनीही समजून घ्यायला हवे. संयुत्क आघाडी कॉंग्रेसशिवाय असू शकत नाही हे वास्तवचं आहे. इतर कोणत्याही प्रादेशिक पक्षापेक्षा कॉंग्रेसचा विस्तार फार मोठा आहे, जरी ती सत्तात नसली तरीही. (I am not interested in becoming UPA president NCP president Sharad Pawar)

Sharad Pawar
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवा अन्यथा..; राज ठाकरेंची उद्धव सरकारला धमकी

कॉंग्रेसने मजबूत व्हायला हवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मतालाही पवारांनी दुजोरा दिला आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. रशिया (Russia) आणि चीनसारख्या (Chaina) एका पक्षाच्या राजवटीवर आमचा कधीच विश्वास नाही, असंही पवार म्हणाले.

अल्पसंख्याकांविरूध्द अपप्रचारासाठी कश्मीर फाईल्स आहे,

पवार म्हणाले की, हा चित्रपट पाहिल्यानंतर एका समाजाच्या मनात दुसऱ्या समाजाविरुद्ध द्वेष निर्माण होणार, अश्या प्रकारे हा चित्रपट बनवण्यात आला आहे. बाजप चित्रपट आणि मुद्द्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. मला खात्री आहे की, पाटनिवडणुकाच्या अगोदर हा चित्रपट मतदारांना मोफत दाखवला जाईल, असंही पवार यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com