Rupali patil, Gopichand Padalkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

रुपाली पाटीलांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप - प्रत्यारोप संपेनात

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही दिवसांतील मागोसा घेतल्यास महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ राजकीय नेत्यांना एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करणे, खालच्या स्तरावर टीका करणे आणि राहिलाच वेळ तर मग आपण जनेसाठी खुप काही करत आहोत हे दाखवणे असे सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे. (Rupali Patil criticizes Gopichand Padalkar )

याबाबत रुपाली पाटील म्हणाल्या की, “गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजपा नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत. केवळ ते बोलू शकत नाहीत, म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात,” अशा बोचऱ्या शब्दांत रुपाली पाटील यांनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, “गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे असल्याने भाजपाने त्यांना आमदार बनवलं आहे. आपल्या मालकाला खूश करण्यासाठी ते शरद पवारांवर नेहमी टीका करत असतात. भाजपाने महादेव जाणकरांचा देखील उपयोग करून घेतला, तेही पडळकरांप्रमाणे शरद पवारांवर टीका करत होते. पण ते वेळीच शहाणे झाले आणि त्यातून बाहेर पडले. पण भाजपाला सतत शरद पवारांना लक्ष्य करायचं असतं.”

त्यामूळे महाराष्ट्रातील नेते यापुढे तरी महागाई, वाढती बेरोजगारी. होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि आपलं कधी ना कधी भलं होईल या आशेने जीवन असह्यपणे जगत असलेला सामान्य नागरिक यांच्याकडे कधी गांभिर्याने पाहणार आहेत का ? . या प्रश्नाचे उत्तर सद्या तरी कोणाकडे ही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT