बंधने घातली जातात तिथे थांबायचं नसतं - संभाजीराजे छत्रपती

किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Dainik Gomantak
Published on
Updated on

किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला ही उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या. "सार्वभौम" स्वराज्य स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास त्रिवार मुजरा असे म्हटले आहे. ( 348th Shiva Rajyabhishek ceremony held at Fort Raigad )

Sambhajiraje Chhatrapati
'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच असेल' राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

संभाजीराजे छत्रपती यांनी या सोहळ्यास उपस्थित राहात त्यांनी शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी बोलताना म्हणाले की, स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, परंतु, तो तह त्यांनी धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधने घातली जातात तिथे थांबायचं नसतं, अशी महाराजांची शकवण आहे. शिवाजी महाराज यांचं स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून केला आहे.

Sambhajiraje Chhatrapati
''सर्वप्रथम देश आणि नंतर स्वतः हे भाजपाला कधी समजणार''

कोरोनामूळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती राजकीय वक्तव्ये करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, मी आज राजकीय बोलणार नाही असे स्पष्ट करत संभाजी राजे यांनी यावेळी कोणाचेही थेट नाव घेतले नाही. परंतु, अनेक ऐतिहासिक दाखले देत राज्यसभा निवडणूकीवरुन आणि रायगडावरील सोयी-सुविधांवरुन राज्य सरकारवर नाव न घेता टीका केली.

तुम्ही शिवभक्तांसाठी केलं काय ?

मागील दोन वर्षात कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने झाला. त्यावेळी मी रायगडावर येऊ नका अशी हाक दिली होती आणि तुम्ही माझा शब्द ऐकला. हा छत्रपतींबद्दलचा विश्वास आहे, प्रेम आहे. रायगडावर कोणतीही सोय नसताना देखील शिवभक्त राज्याभिषेक सोहळ्याला हजर असता. त्यामुळे माझा सरकारला प्रश्न आहे की, तुम्ही शिवभक्तांसाठी काय केलं ? एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचं. सोय होत नसेल तर हा लढा इथूनच सुरु होईल. मग होऊन जाऊ द्या, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी दिला.

यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की मी किल्ल्याचं संवर्धन जतन सुरु केलं असून राष्ट्रपतींना देखील शिवाजी महाराजांसमोर आणलं आहे. परंतु, मला कोणी सांगितले की, उद्या राजीनामा द्या तर मी लगेच देईन. मला फरक पडत नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com