Cricketer Heart Attack on Ground Dainik Gomantak
महाराष्ट्र

Cricketer Death: बॅटिंग करत होता अन् अचानक... LIVE सामन्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं क्रिकेटपटूचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Cricketer Heart Attack on Ground: क्रिकेटच्या मैदानावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Sameer Amunekar

रत्नागिरी: क्रिकेटच्या मैदानावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिचखारी येथे आयोजित एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळताना एका ३५-४० वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाल्याची पाहायला मिळत आहे.

नेमकी घटना काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, चिचखारी येथे 'स्वराज्य प्रतिष्ठान' आणि 'कोकण नगर' या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. स्वराज्य प्रतिष्ठानचा संघ फलंदाजी करत असताना प्रवीण पवार नावाचा खेळाडू नॉन-स्ट्राइक एंडला उभा होता.

सामना अत्यंत चुरशीच्या वळणावर असताना अचानक प्रवीणची प्रकृती बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो धावत पंचांच्या जवळ गेला, आणि तिथेच जमिनीवर कोसळला.

लाईव्ह सामन्यातच मृत्यूचा थरार 

या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सुरू होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रवीण पंचांकडे जात असताना अचानक लडखडू लागला. पंचांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला आणि मैदानावरील इतर खेळाडूंनीही त्याच्या दिशेने धाव घेतली.

मात्र, तो काही समजण्यापूर्वीच प्रवीण मैदानातच कोसळला. हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की, त्याला रुग्णालयात नेण्याची आधीच मैदानावरच त्याची प्राणज्योत मालवली.

स्थानिक खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण 

काही दिवसांपासून स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये तरुण खेळाडूंचा हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या टूर्नामेंटमधील खेळाडूंच्या आरोग्याचा आणि मैदानावर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मनोरंजनासाठी खेळला जाणारा हा खेळ प्रवीणच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी कधी काळ बनेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT