Tirumala Tirupati Goa: ‘तिरुमला’चे संचालक अखेर झुकले! ऑडिटसाठी कागदपत्रे सादर करण्‍याची दिली हमी; NOC रद्दमुळे दणका

Tirumala Tirupati Society Goa: या सोसायटीने सुरू केलेल्‍या सतराही शाखांचे ऑडिट केल्‍यानंतरच ‘एनओसी’संदर्भात पुढील निर्णय घेण्‍यात येईल, असे आपटे यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.
Tirumala Tirupati Cooperative Credit Society Goa
Tirumala Tirupati Cooperative Credit Society GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात तेरा शाखा सुरू करण्‍यासाठी दिलेली ‘एनओसी’ रद्द केल्‍यानंतर धास्‍तावलेल्‍या तिरुमला तिरुपती मल्‍टिस्‍टेट को–ऑपरेटिव्‍ह क्रेडिट सोसायटीच्‍या दोन संचालकांनी गुरुवारी सहकार निबंधक आशुतोष आपटे यांची भेट घेत, आवश्‍‍यक ती कागदपत्रे सादर करण्‍याची हमी दिलेली आहे.

या सोसायटीने सुरू केलेल्‍या सतराही शाखांचे ऑडिट केल्‍यानंतरच ‘एनओसी’संदर्भात पुढील निर्णय घेण्‍यात येईल, असे आपटे यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले. वारंवार सूचना करूनही ऑडिट करू देत नसल्‍यामुळे सहकार निबंधक आपटे यांनी मंगळवारी तिरुमाला तिरुपती मल्‍टिस्‍टेट को–ऑपरेटिव्‍ह क्रेडिट सोसायटीला राज्‍यात तेरा शाखा सुरू करण्‍यासाठी दिलेली ‘एनओसी’ रद्द करण्‍याचा निर्णय घेतला.

Tirumala Tirupati Cooperative Credit Society Goa
Tirumala Tirupati Goa: ‘तिरुमला तिरुपती’चे गुंतवणूकदार धास्तावले! नियमभंग भोवला; राज्‍यभरातील विविध शाखांमध्‍ये पैशांसाठी झुंबड

याची माहिती मिळताच सोसायटीत आर्थिक गुंतवणूक केलेल्‍या ठेविदारांनी पैसे काढण्‍यासाठी बुधवारी पाटो–पणजीसह इतरही शाखांमध्‍ये गर्दी केली होती. दरम्‍यान, सोसायटीच्‍या दोन संचालकांनी गुरुवारी आपली भेट घेत ऑडिटसंदर्भात आवश्‍‍यक ती सर्व कागदपत्रे सादर करण्‍याची हमी दिलेली आहे. परंतु, ऑडिटनंतरच ‘एनओसी’संदर्भात निर्णय घेण्‍याचे खात्‍याने ठरवले असल्‍याचे आपटे यांनी स्‍पष्‍ट केले.

Tirumala Tirupati Cooperative Credit Society Goa
Tirumala Tirupati: 'तिरुमला-तिरुपती'चे ना हरकत दाखले रद्द, शाखा विस्तारापूर्वी दणका; तपासणीस असहकार्य

‘त्‍या’ चार शाखांबाबतही स्‍पष्‍टीकरण द्या!

तिरुमला तिरुपती मल्‍टिस्‍टेट को–ऑपरेटिव्‍ह क्रेडिट सोसायटीला राज्‍यात तेरा शाखा सुरू करण्‍यासाठी ‘एनओसी’ देण्‍यात आलेली होती. तरीही व्‍यवस्‍थापनाने बेकायदेशीररीत्‍या चार शाखा सुरू केलेल्‍या आहेत. त्‍याबाबतचे स्‍पष्‍टीकरणही आपण व्‍यवस्‍थापनाकडून मागवले आहे, असेही आपटे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com