Goa Politics: '2027 मध्ये काँग्रेसचेच सरकार येणार'! पाटकरांचा विश्वास; प्रभाव असलेले मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण

Amit Patkar Goa Congress: काँग्रेसचा प्रभाव आहे ते मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षांना आम्ही सोडणार नाही, असे स्पष्ट मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मांडले.
Amit Patkar Goa Congress
Amit Patkar Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आगामी विधानसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात लढवावी हे काँग्रेसचे धोरण असले तरी ज्या मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव आहे ते मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षांना आम्ही सोडणार नाही, असे स्पष्ट मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मांडले.

मडगाव येथे वीज नियामक आयोगाची सुनावणी होती. त्या सुनावणीत आपली मते मांडण्यासाठी पाटकर आणि अन्य काँग्रेस नेते आले असता त्यांना युतीबद्दल विचारले असता, जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ११ जागा दिल्या. यावरून गोव्यातील जनतेला २०२७ साली गोव्यात काँग्रेस सरकार सत्तेवर यायला हवे हे दिसून येते.

बाणावली व वेळ्‍ळी या दोन मतदारसंघातही जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस उमेदवार निवडून आले. यावरून लोकसभा निवडणुकीत ‘आप’मुळे दक्षिण गोव्यात काँग्रेस उमेदवार जिंकला, असा जो दावा केला जात होता तो फोल होता हे सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.

Amit Patkar Goa Congress
Goa Politics: खरी कुजबुज; गोवा वाचवा बॅनर

लोकसभा निवडणुकीनंतर लगेच झालेल्या बाणावली झेडपी पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा करावा, असे दक्षिण गोवा काँग्रेस समितीने हट्ट धरला होता. तरीही युती धर्मासाठी ‘आप’ला पाठिंबा दिला. मात्र झेडपी निकालाने त्यावेळी जिल्हा समिती बाणावली काँग्रेस स्वबळावर जिंकू शकते, असा जो दावा करत होती, तो योग्य होता हे सिद्ध झाले आहे, असे पाटकर म्हणाले..

Amit Patkar Goa Congress
Goa Politics: खरी कुजबुज; बाबूश यांचा बैठकांचा सपाटा

उत्पलनी वैचारिक भूमिका स्पष्ट करावी!

दरम्यान, अमित पाटकर यांनी पणजीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महापालिका निवडणुकीत काँग्रेस उत्पल पर्रीकर यांच्या पॅनेलला साथ देणार अशी चर्चा होते आहे. यावर काँग्रेस उत्पलना साथ देणार का? या पत्रकारांनी केलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना आधी उत्पल पर्रीकर यांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन पाटकर यांनी त्यांना केले. मगच पणजी महापालिका निवडणुकीत सहकार्याबाबत मत देता येईल, असे सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com