Kolhapuri  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पलची न्यायालयातून निर्दोष मुक्तता! न्यायालयातील खटला रद्द

कोल्हापुरी चप्पल जिवघेणे हत्यार होऊ शकत नाही - न्यायालय

Pramod Yadav

कोल्हापुरी चपलेने भावाने मारहाण केल्याप्रकरणी बीडमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरी चपलेने गंभीर दुखापत कशी होईल? असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपांची निर्दोष मुक्तता केली.

तसेच, कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' नाही, असा निर्वाळा देखील औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खटला रद्द केला असून, कोल्हापुरची रांगडी ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

काय म्हणाले न्यायालय?

भादंवि कलम 324 नुसार फौजदारी खटला औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. आर. एम. जोशी यांनी यांनी याबाबत निकाल दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ही घटना घडली बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात. झाले असे की मंगेश मंचकराव देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी मंगेशचा सख्खा भाऊ अनंत देशमुख यांना कोल्हापुरी चपलेने मारहाण केली. याबाबत अनंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती-पत्नी विरुद्ध भादंवि कलम 452,324,323,504 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल केला.

मात्र, कोल्हापुरी चपलेने गंभीर दुखापत कशी होईल? असा प्रश्न उपस्थित करत पती-पत्नीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. अॅड. हनुमंत जाधव यांच्यामार्फत त्यांनी सदर गुन्हा आणि खटला रद्द व्हावा अशी मागणी केली.

याच प्रकरणी निकाल देताना कोल्हापुरी चप्पल जिवघेणे हत्यार होऊ शकत नाही असे म्हणत न्यायालयाने दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला रद्द केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT