Aaditya Thackeray: औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक

रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाली व मोठा गोंधळ झाला.
Aaditya Thackeray
Aaditya ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

औरंगाबादच्या दौऱ्यावर असणारे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आला अशी माहिती समोर येत आहे.

औरंगाबादच्या महालगावमध्ये ही घटना घडली आहे. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली. रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाली व मोठा गोंधळ झाला.

Aaditya Thackeray
Kankavli : पोलीस ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे आज औरंगाबाद मधील महालगाव, वैजापूर दौऱ्यावर होते. यावेळी महालगाव येथे शिवसंवाद यात्रेचा मेळावा होत असताना तिथेच रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती.

सभा सुरु असल्याने बाजूला रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेली मिरवणूक आणि डीजे थांबवण्याची विनंती पोलिसांनी केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने किरकोळ दगड स्टेजवर फेकले.

Aaditya Thackeray
Mumbai-Goa: घरच्यांची लग्नासाठी जबरदस्ती, मुंबईची डॉक्टर विद्यार्थीनी गोव्यात अंडरग्राउंड झाली अन...

दरम्यान, परिसरात तणाव निर्माण झाल्याचे पाहून माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. आदित्य ठाकरेंनी खाली उतरून भाषण केलं.

आदित्यनीं दिलगिरी व्यक्त करत जयंती साजरी करा, असं देखील म्हटले. भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला जर डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सभेनंतर काही लोकांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशी माहिती मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com