दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) दिव्यांग असलेल्या एका ज्येष्ठ परदेशी महिलेकडून व्हिलचेअरसाठी खंडणी घेतली असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी इंग्लंडची रहिवाशी असलेल्या या महिलेने विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गोवा राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाने देखील घेतली होती, आयोगाने दाबोळी विमानतळाच्या संचालकांना मंगळवारी (दि.07) नोटीस बजावली. यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण, गोवाने सक्त कारवाई करत तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
"ग्राउंड हँडलिंग एजन्सीचा 01 कर्मचारी लोडर (पर्सन ऑफ रिड्युस्ड मोबिलिटी) प्रवाशाला मदत करत होते आणि ट्रॉली रिट्रीव्हिंग एजन्सीचे 02 लोक त्या प्रवाशाशी नियमांविरुद्ध संवाद साधत होते. असे या प्रकरणाच्या तपासानंतर आढळून आले. भारतीय विमानतळ प्राधिकरण, गोवा अशा बेकायदेशीर कृत्यांचा तीव्र निषेध करते." असे दोबोळी विमानतळ गोवाचे संचालक एसव्हीटी धनमजय राव यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
“ग्राउंड हँडलिंग एजन्सीने पीआरएम पॅसेंजरला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच, 02 ट्रॉली रिट्रीव्हर्सचे एअरपोर्ट एंट्री परमिट (AEP) AAI गोवाने जप्त केले आणि पुढील कारवाईसाठी एजन्सीला कळवले आहे,” असे राव म्हणाले.
काय आहे प्रकरण?
कॅथरिन फ्रान्सेस वोल्फ (वय 62) या दिव्यांग असलेली ज्येष्ठ महिला 29 जानेवारी 2023 रोजी गोव्यातून इंग्लंडला प्रवास करणार होत्या. दाबोळी विमानतळावर त्यांना व्हिलचेअरचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडून 4,000 रूपये खंडणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विमानतळावर त्यांच्यासोबत झालेल्या गैरव्यव्हार प्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिस, दक्षिण गोवा पोलिस आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. कॅथरिन यांना नैराश्याचा देखील त्रास असल्याची माहिती समोर आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.