वर्धा: वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) सेवाग्राम बापू कुटी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. याच सेवाग्रामच्या आवारात खादी ग्रामोद्योग केंद्र आहे. या खादी भांडारने, ग्रामोद्योग आयोगाच्या खादी मार्क नोंदणी प्रमाणपत्र घेतले नसल्याने सदर दुकानातून अनधिकृत खादी कापडांची बेकायदेशीर विक्री तात्काळ थांबविण्यात यावी आणि खादी ग्राम नावाचा वापर करणे बंद करावा अन्यथा सदर बापू कुटी आश्रम प्रतिष्ठानाच्या दुकानावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे आयोगाने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणाहून खादीच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली त्याच ठिकाणी कायद्याचा धाक दाखवला जात आहे तसेच ज्या महात्म्याने खादीला चालना दिली लोकोांना खादी घालण्यासाठी प्रोत्साहित केले तेथीलच खादी वर प्रहार करण्याचा डाव आता खादी व ग्रामोद्योग आयोगासारख्या संस्था मांडताना दिसत आहे. या खादी दुकानाचे प्रमाणपत्र नसल्याने ही खादी अवैध असल्याचे आयोगाकडून कळविण्यात आले.
आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले ज्या दुकानातून खादीची विक्री केली जात आहे त्या दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र केलेले नाही मात्र सेवाग्राम मंडळाचे खादी ग्राम आयोगाचे प्रमाणपत्र नोंदणी आहे ही त्याच दुकानांची घटक दुकान आहे. याबाबत आश्रम प्रतिष्ठान ची बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकी नंतर आयोगाला पत्र दिले जाईल मात्र काही अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करीत कायद्याच्या रचनेनुसार कारवाई करतात अशी खंतही त्यांनी फोनवरून व्यक्त केली.
इंग्रजांच्या काळातील बाजार व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी महात्मा गांधी यांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा नारा दिला होता. घराघरात खादी तयार व्हावी तिचा वापर देखील व्हावा याशिवाय हाताला काम मिळावे हा त्यांचा उद्देश होता. यासाठीच त्यांनी चरखा संघाची स्थापना केली होती. रचनात्मक कार्यातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न त्याकाळी केला जात होता. आचार्य विनोबा भावे यांनी यासाठी खादी मिशनची स्थापना केली होती गावागावात उद्योगाची निर्मिती झाली होती गांधी काळात हाताला काम मिळाले होते. तीच खादी आजही सेवाग्राम आश्रमात अजूनही निर्माण होत आहे. सेवाग्राम आश्रमात त्याची विक्री देखील केली जात आहे ज्या आयोगाने आपली खादी अवैध आहे असे पत्रातुन सेवाग्राम आश्रमाला सुचविले आहे त्याच आयोगाच्या निर्मितीसह आयोगातील अधिकार्यांना देखील याच खादीमुळे रोजगार मिळाला आहे. पण त्याच खादी वर खादी प्रमाणपत्र मार्क ची नोंदणी नसल्याने ती अवैध ठरविण्यात आली आहे.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या बापू कुटीच्या आवारात असलेल्या "खादी ग्रामोद्योग भंडारला भारत सरकारच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या प्रतिनिधीने भेट दिली असता खादी प्रमाणपत्र प्राप्त न करता खादी ग्रामोद्योग भांडार मधून अप्रमाणित खादी कापडांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे निदर्शनात आल्याचे आयोगाच्या पत्रात सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.