'राज ठाकरे तीन चार महिने भूमिगत असतात'

राज ठाकरेंच्या जातीपातीचं राजकारणावरील टीकेला शरद पवारांनी उत्तर
Raj Thackeray and Sharad Pawar
Raj Thackeray and Sharad Pawardainik gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधताना, जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला हवं आहे, अशी टीका केली होती. तर १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच पवार यांनी जातीचा द्वेष करायला लावला असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरेंना टोला लगावला आहे. हा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला असून राज ठाकरे तीन चार महिने भूमिगत असतात असं पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते. (Sharad Pawar Rejecting Raj Thackeray's allegation, and pawar says Raj Thackeray remains underground for months)

Raj Thackeray and Sharad Pawar
मनसे ही भाजपची C टीम : शिवसेनचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधताना, राष्ट्रवादी जातीवाद पसरवत असल्याची टीका केली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या गेल्या चार पाच वर्षाच्या वाटचालीचा त्यांनी उल्लेक करताना टीका केली होती. त्या या टीकेला शरद पवारांनी (Sharad Pawar) उत्तर दिलं असून, राष्ट्रवादीची (NCP) भूमिका ही सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची आहे. राज ठाकरे हे तीन ते चार महिने भूमिगत असतात आणि मग लेक्चर देतात. आणची भूमिका ही आजही आणि उद्याही एकच राहिल. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे, असंही पवार म्हणाले.

तसेच राज यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबद्दल (PM Narendra Modi) आधी काय भूमिका घेतल्या होत्या. ते राज्यातल्या जनतेनं पाहिलं आहे. आता त्यांच्यामध्ये गुणात्मक बदल झाला आहे. मात्र हेच राज ठाकरे उद्या काय बोलतील हे कोणीच सांगू शकणार नाही, अशी खोचक टीका राज ठाकरे यांच्यावर पवार यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com