Agriculture News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Agriculture News: दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture News शेती व्यवसायाला पूरक धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं जातं. किंबहुना बहुतांश शेतकरी वर्ग आता दूध व्यवसायाकडे वाळू लागल्याचे चित्र दिसत आहे.

मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन करणारे पशुपालक ज्यावेळी डेअरीला तसेच दूध संस्थांना दूध पुरवतात तेव्हा त्यावेळी त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

याच पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर (milko meter) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला असून किसान सभेनं केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाच्या अंतर्गत असलेल्या नियंत्रण वैधमापन शास्र या यंत्रणेमार्फत मिल्कोमीटर आणि वजनकाटे नियमित तपासण्यात येतील असं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंआहे.

तसेच या मिल्कोमीटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्याची कारवाई प्राधान्याने करण्यात येईल असंही लेखी आश्वासन राज्य सरकारनं किसान सभेला दिलं आहे.

दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर आणि वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जाते. दुधाचे भाव दुधातील फॅट आणि एस.एन.एफ.च्या प्रमाणानुसार ठरत असतात.

फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्यानं सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते आणि त्याद्वारे शेतकऱ्यांची मोठी लूट करण्यात येते.

सद्य स्थितीत राज्यातील खासगी दूध संघांवर शासनाचे नियंत्रण नाही. याबाबत संबंधितांसोबत बैठक घेऊन, दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी खासगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

यापुढे दूध संकलन केंद्रांवर प्रमाणित केलेले मिल्कोमीटर वापरावे लागतील व वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाईल.

अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

POP Ganesh Idol Ban: पीओपी गणेशमूर्तींवर बंदी, पण कारवाईचे काय?

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Shravan Shanivar: श्रावण शनिवारचा दुर्मिळ योग! साडेसातीचा त्रास मिटेल; अश्वत्थ मारुतीचे व्रत कसे करावे? वाचा

SCROLL FOR NEXT