Maharashtra D. Ed Course: शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता 'हा' अभ्यासक्रम ठरणार महत्वाचा

राज्यातील डीए़ड कॉलेज बंद होणार असल्याची चर्चा आहे.
D. Ed Course
D. Ed CourseDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra D. Ed Course शिक्षकी पेशा हा प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जातो. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बरेचजण शिक्षकी पैशासाठी आवश्यक असणारा डीएड'चा अभ्यासक्रम पूर्ण करून प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू होऊन ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

याच विषयी आता एक अपडेट हाती येतेय. राज्यातील डीए़ड कॉलेज बंद होणार असल्याची चर्चा आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता डीएड कालबाह्य होणार असून शिक्षक होण्यासाठी इंटिग्रेटेड बी एड डिग्री कोर्स असणार आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम राज्याच्या शैक्षणिक वर्तुळावर होणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. याची राज्यात लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असणार आहे.

D. Ed Course
Patra Chawl Case : पत्राचाळ प्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील कोट्यावधींची मालमत्ता ED कडून जप्त

आता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षाचा हा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. तीन वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल.

तर चार वर्षाची डिग्री पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर (मास्टर)अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स शिक्षक होण्यासाठी करता येणार आहे.

मात्र या संदर्भात शिक्षण विभागाकडून अधिकृतरित्या जाहीर केले गेले नसून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com