गणेशोत्सवाची चाहूल लागताच कोकणवासियांची मुंबई-पुण्यासह इतर शहरांतून गावाकडे धावपळ सुरू होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून कोकणात आता 16 डब्यांची 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार आहे.
मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता वाढवण्याची मागणी केली होती. गणेशोत्सव काळात या गाडीत प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अतिरिक्त डब्यांची तातडीने गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
या मागणीची केंद्र सरकारने दखल घेतली असून वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ८ डब्यांची भर घालण्यात येणार आहे. यामुळे यापूर्वी ८ डब्यांची असलेली ही गाडी आता १६ डब्यांची होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार असून गर्दीत होणारी धावपळ आणि गोंधळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.
कोकणवासियांसाठी गणेशोत्सव म्हणजे वर्षातील सर्वांत मोठं आणि भावनिक सण. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आदी शहरांत कामानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणकरांना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी या काळात रेल्वे हीच सर्वात महत्त्वाची सोय ठरते.
मात्र तिकिटांच्या कमतरतेमुळे आणि गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याच्या निर्णयामुळे या समस्येत दिलासा मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.