Goa Politics: 36 तास उलटले तरी कामत, तवडकर यांना खातेवाटप नाही! 'अमावस्ये'मुळे निर्णय रखडल्याची चर्चा

Goa Cabinet Ministers: मुख्यमंत्री कार्यालयाकडे चौकशी केल्यावर खाते वाटपाची सूचना कार्यालयाकडून सर्वसाधारण प्रशासन खात्याला दिलीच गेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी खातेवाटप होईल अशी चर्चा होती.
Digambar Kamat and Ramesh Tawadkar Ministers Oath Goa
Digambar Kamat And Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मंत्रिपदी शपथ घेतलेल्या दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना शपथ घेऊन ३६ तास उलटले, तरी खाती मिळालेली नाहीत. नव्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करणारी अधिसूचना राज्य सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून जारी करण्यात आलेली नाही.

राजभवनावर काल दुपारी १२ वाजता या कामत व तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्याकडून घेतल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत खातेवाटपाची अधिसूचना जारी होईल अशी चर्चा सचिवालयात होती. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना सायंकाळी येणाऱ्या डाकमधून तरी अधिसूचनेची प्रत येईल असे वाटत होते.

अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडे चौकशी केल्यावर खाते वाटपाची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्वसाधारण प्रशासन खात्याला दिलीच गेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी खातेवाटप होईल अशी चर्चा होती.

Digambar Kamat and Ramesh Tawadkar Ministers Oath Goa
Goa Politics: कामत, तवडकरांना 2 दिवसांत खाती! सोहळ्याकडे विरोधकांनी फिरवली पाठ; लोबो दाम्‍पत्‍यासह गावडे, बाबूशची अनुपस्‍थिती

शुक्रवारी सकाळी ११.५५ वाजल्यापासून भाद्रपद अमावास्येस सुरवात झाल्याने सकाळी ११.३५ पर्यंतच्या काळात खातेवाटपाची अधिसूचना जारी केली जाणार नसल्याचीही चर्चा आहे. शनिवारी व रविवारी राज्य प्रशासनास सुट्टी असल्याने आता थेट सोमवारीच खातेवाटपाचा आदेश जारी केला जाईल असे सांगण्यात येते. राज्य मंत्रिमंडळात तवडकर व कामत यांचा समावेश होणार याची कल्पना आधीच होती. कारण कधी नव्हे ते शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रेही सरकारने छापली होती.

Digambar Kamat and Ramesh Tawadkar Ministers Oath Goa
Goa Politics: ‘शपथविधी’त गर्दीचा उच्चांक! कामत, तवडकरांची छाप; मूळ भाजप कार्यकर्ते मात्र अनुपस्थित

त्यामुळे त्यांना कोणती खाती द्यावीत हे आधी ठरवता येणे शक्य होते. तरीही खातेवाटप अडल्याने कोणीतरी कोणत्या तरी वजनदार खात्याची मागणी करत आहे आणि ते खाते अन्य तेवढ्याच प्रभावशाली मंत्र्याकडे असल्याने पेच निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com