Goa Shivsena: विधानसभेची तयारी? एकनाथ शिंदेची शिवसेना गोव्यात करणार महत्वाची घोषणा

Shivsena In Goa: निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी असला तरी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आता गोव्यात पक्षविस्तारासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
Shiv Sena political announcement Goa | Goa politics latest updates
Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पक्ष गोव्यात आज (शनिवारी) पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहे. मार्चमध्ये पक्षाचे संपर्क नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी राज्यात येऊन राज्यव्यापी कार्यकर्ता शिबीर घेतले होते. यावेळी त्यांनी  एक लाख सदस्य नोंदणीचे उद्धीष्ट ठेवले होते.

गोवा विधानसभेची निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी असला तरी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आता गोव्यात पक्षविस्तारासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मार्च महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रज्यात चाचपणी करण्यात आली.

गजाजन कीर्तीकरांनी कार्यकर्ता शिबीर घेऊन पक्ष सुरुवातील गोव्यातील अन्यायाविरोधात लढा उभारेल आणि त्यानंतर निवडणूक लढविण्याचा विचार करेल, असे स्पष्ट केले होते. तीन महिन्यात राज्यात एक लाख सदस्य नोंदणीचे उद्धीष्ट देखील त्यांनी ठेवले होते.

Shiv Sena political announcement Goa | Goa politics latest updates
Shivsena In Goa: एकनाथ शिंदेंची शिवसेना गोव्यात अन्यायाविरोधात जनआंदोलन उभारणार; गजानन कीर्तीकरांनी सांगितला प्लॅन

दरम्यान, आता पक्षाने राज्यात पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्याचा निर्णय घेतला असून, गोव्यातील पक्षाचे चेहरे निश्चित होणार आहेत. यानिमित्ताने पक्ष राज्यातील पुढील वाटचालीची दिशा आणि भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

गोमंतभूमीत खनिज व्यवसाय आदी अनेक बेकायदा गोष्टी घडत आहेत. रोजगार आदीबाबतीत गोमंतकीयांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात शिवसेना संघर्ष करणार असल्याची भूमिका पक्षाने मांडली होती.

Shiv Sena political announcement Goa | Goa politics latest updates
NCP Goa: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, गोव्यात स्वबळावर लढणार निवडणूक; राष्ट्रीय नेता 3 दिवसीय दौऱ्यावर

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही गोव्यात एन्ट्री

एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित दादांच्या राष्ट्रवादीने देखील गोव्यात प्रवेश केला आहे. जूनमध्ये पक्षाचे राष्ट्रीय नेते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी राज्यात तीन दिवसीय दौरा केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील गोव्यात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी गोव्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com