Deccan Express Vistadome Twitter/@CentralRailway
महाराष्ट्र

Deccan Express Vistadome: जाणून घ्या डेक्कन एक्स्प्रेसचा टाइमटेबल

01007 डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express Vistadome) विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथून दररोज सकाळी 7 वाजता सुटणार आहे आणि पुण्यात (Pune) 11.05वाजता दाखल होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: शनिवारी पहिल्यांदा डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express Vistadome) मुंबई ते पुणे (Mumbai-Pune) दरम्यान व्हिस्टाडोम कोचसह चालविण्यात आली. या कोचच्या सर्व 44 जागा पहिल्याच ट्रिपमध्ये भरल्या गेल्या. प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपला प्रवास मोबाईलमध्ये कैद केला आणि छान निसर्गाचा आनंद उपभोगला.(Find out the timetable of Deccan Express Vistadome)

शनिवारी सकाळी सात वाजता डेक्कन एक्स्प्रेस मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रवाना झाली. प्रवास सुरू करण्यापूर्वी काही उत्साही प्रवाश्यांनी सीएसएमटी प्लॅटफॉर्मवरील कोचजवळ सेल्फी पॉईंटवर सेल्फी क्लिक केल्यात. त्याचवेळी एका प्रवाशाने 'कोचच्या आत दिसणाऱ्या' दृष्यासारखा केकही कापला.

डेक्कन एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम डबे बसवून, प्रवाश्यांना वाटेतल्या सर्व सुंदर टेकड्यांचा आणि निसर्गरम्य दृष्यांचा आनंद घेता आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एका व्हिडिओद्वारे या प्रवासाची झलक शेअर केली आहे. ही गाडी दक्षिण-पूर्व घाटखंडमधील प्रसिद्ध माथेरान हिल्स, सोनगीर हिल्स, उल्हास नदी, उल्हास व्हॅली, खंडाळा आणि लोणावळा, धबधबा आणि बोगद्यातून जाणार आहे. यामुळे प्रवाशांना निसर्गाची आगळी वेगळी अनुभूती अनुभवयाला मिळणार आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, वातानुकूलित कोचमध्ये काचेचे छत, मोठ्या पारदर्शक खिडक्या, लक्झरी आणि आरामदायक सिट्स आहेत. या खुर्च्या 180 डिग्री पर्यंत फिरू शकतात, याचा अर्थ असा की आता त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाश्याशी बोलण्यासाठी मान फिरवण्याची गरज प्रवाशांना भासणार नाही. आपण सिट्स फिरवून आरामात एकमेकांशी संवाद साधू शकाल. त्याच वेळी, आपल्याला कोचमधूनच काचेच्या मोठ्या विंडोमधून बाहेरील दृश्य आरामात पाहू शकता येणार आहे.

काय आहे व्हिस्टाडोम ची खासियत ?

  1. कोचमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या बसवलेले आहेत. काचेचे छप्पर, ऑब्जरवेशन लाउंज, रोटेशनल सीट्स आहेत.

  2. कोचमध्ये वाय-फाय-आधारित प्रवासी माहिती सुचनादेखील पुरविली गेली आहे.

  3. खिडक्या ग्लास शीटने लॅमिनेट केल्या आहेत. यामुळे त्यांना तडा गेल्यास त्या तुटणार नाही.

  4. कोचमध्ये एअर-स्प्रिंग सस्पेंशन देखील आहे. ऑब्जरवेशन लाऊंजमध्ये मोठ्या खिडक्या आहे.

  5. प्रत्येक प्रवाशाच्या सीटखाली मोबाइल चार्जिंग पॉईंट्स दिले जातात.

  6. येथे डिजिटल डिस्प्ले आणि स्पीकरची सुविधा देखील आहे. आपण आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता.

  7. डब्यात स्वयंचलित सरकता दरवाजे बसविण्यात आले आहेत.

  8. जीपीएस सिस्टम, सन-इन टाइप एलईडी डेस्टिनेशन बोर्ड, स्टेनलेस स्टील मल्टी-टियर लगेज रॅक असणार आहे.

  9. रिफ्रेशमेंटमध्ये मिनी पँट्री, मायक्रोवेव्ह ओव्हन, कॉफी मेकर, वॉटर कूलर, रेफ्रिजरेटर आणि वॉश बेसिन बसविण्यात आले आहे.

  10. चालत्या ट्रेन मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरीता सीसीटीव्ही कोचमध्ये बसविण्यात आले आहेत.

  11. कोचचे इंटीरियर खुप खास पद्दतीने डिझाइन केले गेले आहे. एफआरपी मॉड्यूलर टॉयलेट्सुद्दा बसविण्यात आले आहेत.

डेक्कन एक्स्प्रेस टाइमटेबल

01007 डेक्कन एक्स्प्रेस विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी 7 वाजता सुटणार आहे आणि पुण्यात 11.05वाजता दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे 01008 डेक्कन एक्सप्रेस विशेष दररोज दुपारी 3.15 वाजता पुण्याहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7.05 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

ही एक्सप्रेस दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावाला, तळेगाव, खडकी आणि शिवाजी नगर येथे थांबणार आहे. दरम्यान 2017 मध्ये मुंबई-गोवा मार्गावर जन शताब्दी एक्स्प्रेस पश्चिम घाटाचे दर्शन प्रवाशांना लाभण्यासाठी सुरू करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT