Unseasonal Rain Dainik Gomantak
महाराष्ट्र

Unseasonal Rain: पुन्हा एकदा अस्मानी संकट! हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान

गहू, हरभरा, पिकाला मोठा धोका निर्माण झालाय

गोमन्तक डिजिटल टीम

Crop Damage Due To Hail And Unseasonal Rain मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह लगतच्या गोवा आणि कर्नाटक राज्यात हवामान बदल जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अमरावती, हिंगोली, अकोला या ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः हवालदिल केले आहे.

हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस झाली आहे. गहू, हरभरा, पिकाला मोठा धोका निर्माण झाला असून लिंबू,संत्री उत्पादकही संकटात आहेत.

तसेच कांदा उत्पादकही रडकुंडीला आले आहेत. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात होताच त्यात पुन्हा अवकाळीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. कोकणातही सध्या आंबा, काजू , कोकमाचा हंगाम सुरु झालाय.

मागील दोन दिवसांपासून कोकणात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळालं असून या वातावरणाचा परिणाम आंबा पिकांवर होण्याची शक्यता बागायतदारांमधून वर्तवली जातेय.

मागील वर्षीही पडलेल्या अवकाळीने तयार झालेला आंबा गाळून पडलं होता तर शिल्लक राहिलेल्या आंब्यावर किडींचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच फळमाशीचाही सामना बागायतदारांना करावा लागला होता. यंदा तर आंबा उत्पादनच कमी असून जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले आंबा, काजू पीक वाया जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

शेतीची जमीन अन् क्लबचा धंदा; हणजूण येथील 'त्या' क्लबला प्रशासनाचा दणका, ठोठावला 15 लाखांचा दंड

Goa Winter Session: विधानसभेत एक मिनिटाचे मौन! शिरगाव आणि हडफडे दुर्गटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT