Disha Salian death case latest update Dainik Gomantak
महाराष्ट्र

राणे पिता-पुत्र यांना अटकेपासून दिलासा

Disha Salian death case latest update : न्यायालयाकडून राणे पिता-पुत्राला अटकेपासून दिलासा

दैनिक गोमन्तक

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने केली होती. त्याविरोधात दोघां विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना मालवणी पोलिस स्टेशनने चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली गेली होती. याप्रकरणी दिंडोशी न्यायालयाने पिता-पुत्राला अटकेपासून संरक्षण दिले असून १० मार्चपर्यंत दोघांना अटक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र या प्रकरणात दोघांची शनिवारी (५ मार्च) मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी होणार आहे. (Disha Salian death case latest update)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात पत्रकार परिषदा घेत वादग्रस्त विधाने केली होती. त्याविरोधात दिशा सालीयानची आई वसंती सालियन यांनी मालवणी पेलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसीविरोधात राणेंना दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर आज दिंडोशी न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने दोघांना ही अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच १० मार्चपर्यंत दोघांना अटक करता येणार नाही, असा निर्णय ही दिला. राणेंच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपांचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सुर्यवंशी तपास करत आहेत.

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केले होते आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी दिशाच्या बाबतीत आक्षेपार्ह विधाने केली. तसेच नितेश राणे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केली. त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना (Shivsena) नेत्यांवर टीका करताना या प्रकरणात शिवसेनेचा मोठा नेता तुरुंगात जाणार, असे म्हटले होते. तर मी दिशाला न्याय मिळवून देतोय, यासाठी तिच्या कुटुंबियांनी आमचे आभार मानायला हवेत, असेही ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

SCROLL FOR NEXT