Disha Salian Death Case: राणे पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे भाजपचे आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिस स्टेशनने चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली गेली आहे.
Disha Salian death case latest update
Disha Salian death case latest updateDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत आता आणखीनचं वाढ होताना दिसून येत आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दोघां विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना मालवणी पोलिस स्टेशनने चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली गेली आहे. (Disha Salian death case latest update)

Disha Salian death case latest update
Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. दिशा सालीयान यांच्या आई वसंती सालियन यांच्या तक्रारीवरून मालवणी पेलिसांनी या दोन्हीं नोटीस नारायण राणे आणि नितेश राणे यांना बजावल्या आहेत.

दिशा सालियन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यू संदर्भात ती आत्महत्या नसून खून झाल्याचं सांगितल, तसेच तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परीषदेत जाहीररित्या सांगितलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या दिशा सालियन यांच्या पालकांनी आधी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Disha Salian death case latest update
IPCC Report 2022 : मुंबईला बसणार हवामान बदलाचा मोठा फटका

नारायण राणेंच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईतील मालवणी पोलिसांत (Malvani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण राणे तसेचं आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही विधाने केली होती, त्यामध्ये दिशा सालियनची बदनामी केल्याचं सांगत तिच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडून नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com