ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागलेल्या 14 वर्षीय मुलाने रविवारी मध्य मुंबईतील हिंदमाता परिसरात आत्महत्या केली. मात्र या मुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.
दरम्यान, बुधवारी पोलिसांनी सांगितले की, इयत्ता सातवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याला ऑनलाइन गेम गरेना फ्री फायरच्या प्रसिद्ध बॅटल रॉयल मोबाइल गेमचे व्यसन लागले होते, ज्यावर सोमवारी भारत सरकारने चीनमधील इतर मोबाइल अॅप्ससह बंदी घातली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी बांधकाम कंपनीत डिझायनर म्हणून नोकरी करणाऱ्या मुलाच्या वडिलांना रविवारी संध्याकाळी 7.22 वाजता त्यांच्या मुलाचा फोन आला. त्यावेळी त्याचे वडील आपल्या पत्नीसह प्रवास करत होते, त्यामुळे ते कॉल घेऊ शकले नाही. मात्र काही मिनिटांनी वडीलांनी परत कॉल केला असता, मुलाने फोन कॉलला उत्तर दिले नाही.
दरम्यान, मुलाचे आई वडील घरी परतले असता आतून खोली बंद असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर वडीलांनी काचेची चौकट तोडून दरवाजा उघडला असता मुलाने आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर संबंधित भोईवाडा पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला.
तसेच, झोनल चार चे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, "प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, मुलाला फ्री फायर या ऑनलाइन गेमचे व्यसन होते. परंतु त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकलेले नाही."
तथापि, पालक आणि शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, मुलामध्ये गेमिंग व्यसनाचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही. तो एक हुशार विद्यार्थी आणि क्रिकेटचा शौकीन होता.
त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याला फ्री फायर या ऑनलाइन गेमचे व्यसन लागले होते. तो आपल्या मित्रांसमवेत हा गेम खेळत असत. मात्र या गेममधील त्याचे सहकारी कोण होते, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेणेकरुन गेमदरम्यान असे काही घडले की नाही, ज्यामुळे त्याला आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलावे लागले.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.