आजकाल आपल्याला आपल्या बँकांचे (Bank) व्यवहार अतिशय साप झाले आहे कारण आपण आपले सर्व व्यवहार सध्या ऑनलाईन पद्धतीने करतो (Online Banking). आजच्या युगात बहुतांश लोक बँकेशी संबंधित कामासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनची मदत घेतात. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारही (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात याचा गैरफायदा घेत आहेत. आणि सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, आपल्याला सावधगिरी बाळगणे देखील फार महत्वाचे आहे. या पद्धतींपैकी एक म्हणजेच 'स्पूफिंग' (Spoofing attack) आहे.(Banking Online fraud by Spoofing attack in Cyber crime)
'स्पूफिंग' म्हणजे नेमकं काय
'स्पूफिंग' ही एक पद्धत आहे जिथून बँक ट्रँजॅक्शन करताना ऑनलाईन फ्रॉड करण्यासाठी वापरली जाते. ज्यासाठी एक वेबसाइट तयार केली जाते. जी पूर्णपणे बनवत आहे . याचा उद्देशऑनलाईन फसवणूक करणे हा आहे. बनावट वेबसाइट मूळ सारखी दिसण्यासाठी सायबर गुन्हेगार वेबसाइटचे योग्य नाव, लोगो, ग्राफिक्स आणि कोड वापरतात. ते आपल्या ब्राउझर विंडोच्या शीर्षस्थानी अॅड्रेस फील्डमध्ये दिसणारी URL कॉपी करू शकतात. यासह, ते उजव्या हाताला दिलेले पॅडलॉक आयकॉन देखील कॉपी करतात.
हे सायबर गुन्हेगार वेबसाइटवर असे ईमेल पाठवतात, ज्यात तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित माहिती अपडेट किंवा कन्फर्म करण्यास सांगतात. हे खात्याशी संबंधित गुप्त माहिती मिळवण्याच्या उद्देशाने केले जाते. या तपशीलांमध्ये तुमचा इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी, पासवर्ड, पिन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते क्रमांक, कार्ड सत्यापन मूल्य (सीव्हीव्ही) क्रमांक समाविष्ट आहे.अशी पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बँक कधीही गोपनीय माहिती विचारत नाही किंवा त्यासाठी असा ईमेल देखील पाठवत नाही. जर इंटरनेट बँकिंग सुरक्षा तपशील जसे की पिन, पासवर्ड किंवा खाते क्रमांक मागणारा ईमेल प्राप्त झाला, तर त्याला उत्तर ना देणे हेच योग्य ठरेल.
आपल्या स्क्रीनवर येणारे पेडलॉक तपासा. जर ब्राउझर विंडोमध्ये कुठेही पॅडलॉक चिन्ह दर्शवतात. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोररमध्ये, लॉक चिन्ह ब्राउझर विंडोच्या तळाशी उजवीकडे दिसते अशावेळेस वेबसाईटच्या सुरक्षा संबंधित तपशील तपासण्यासाठी साइटवर डबल क्लिक करा.
अशावेळेस वेबपेजचे URL तपासणे फार आवश्यक आहे.सहसा URL "http" ने सुरू होतात. आणि नंतर सुरक्षित कनेक्शनमध्ये, लिंक्स किंवा वेबसाईट URL 'https' सह सुरू होतात. 'https' म्हणजे पेज सुरक्षित आहे. येथे सर्व्हरवर पाठवण्यापूर्वी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड एनक्रिप्ट केला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.