जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

पुण्यात एका 24 वर्षीय महिलेवरती बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी शिवसेनेचे स्थानिक नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ShivSena leader Raghunath Kuchik
ShivSena leader Raghunath KuchikDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एका 24 वर्षीय महिलेवरती बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी शिवसेनेचे (ShivSena) स्थानिक नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ShivSena leader Raghunath Kuchik
परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी घराघरात ओळख: उदय सामंत

शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून, संघटनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कुचिकने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून महिलेशी मैत्री केली होती. तक्रारीनुसार, लग्नाचे आश्वासन देऊन त्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ShivSena leader Raghunath Kuchik
मुंबईत आजपासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू! मुंबई ते बेलापूर प्रवास करा 30 मिनिटांत

गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने तक्रारदार महिलेला गर्भपात करण्यास सांगितल्याचे समो्र आले आहे. दरम्यान, कुचिकने आरोप फेटाळून लावले आणि दावा केला की महिलेने त्याला "हनी-ट्रॅप" मध्ये अडकवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com