Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

'...दारुच्या नशेत मला'; चहलने केला धक्कादायक रहस्याचा खुलासा

यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला, ''मी हे आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही, पण आजपासून सर्वांना हे कळेल.

दैनिक गोमन्तक

खेळाडू असो किंवा सामान्य माणूस, प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो जेव्हा तो मृत्यूला स्पर्श करुन परत येतो. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) खेळाडूंनी अशाच गोष्टी एका खास व्हिडिओमध्ये कथन केल्या ज्यामध्ये एकवेळ त्यांना वाटले की आपला जीव जाणार आता. राजस्थान रॉयल्समधील घातक फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सांगितले की, 'आयपीएल पार्टीदरम्यान मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) एका वरिष्ठ खेळाडूने मला हॉटेलच्या 15 व्या मजल्यावरच्या बाल्कनीत लटकवले होते.' चहल व्यतिरिक्त, करुण नायर आणि आर अश्विन (R. Ashwin) यांनी देखील त्यांच्यासोबत कधी आणि कुठे अशा जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले याविषयी सांगितले आहे. (Yuzvendra Chahal reveals horrifying experience ipl 2013 Mumbai Indians)

दरम्यान, व्हिडिओमध्ये आर अश्विनने चहल आणि नायर यांना विचारले की, 'तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला होता का जेव्हा तुम्हाला वाटले आता सर्व काही संपले.' त्यावर चहलने उत्तर देत म्हटले की, 'माझ्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल मी कधीही कोणाशीही बोललो नाही.' पहिल्यांदाच चहलने आपल्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.

चहलला बाल्कनीतून फाशी देण्यात आली

यजुवेंद्र चहल म्हणाला, ''मी हे आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही, पण आजपासून सर्वांना हे कळेल. 2013 मध्ये मी मुंबई इंडियन्सकडून खेळत होतो. आमची बंगलोरमध्ये मॅच होती आणि मॅचनंतर पार्टी होती. आमच्या संघात एक अतिशय वरिष्ठ खेळाडू होता, ज्याचे नाव मी आता घेणार नाही. त्याने मला बोलावून बाल्कनीत लटकवले. मी त्याची मान धरली होती. जर मी माझे हात तिथे सोडले असते तर मला माहित नाही काय झाले असते कारण मी 15 व्या मजल्यावर होतो. परंतु तिथे असणाऱ्या लोकांनी प्रसंग अवधान राखत मला वाचवलं.''

करुण नायरसाठी पूजा जीवघेणी ठरली

करुण नायरने सांगितले की, ''एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, मी आपल्या आईचा नवस पूर्ण करण्यासाठी एका मंदिरात गेला होतो, जिथे मला नदी पार करुन जावे लागले. मी ज्या बोटीमध्ये बसलो होतो ती बोट अचानक उलटली. त्यावेळी खूप घाबरलो होतो. त्यावेळी मी जीव वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. परंतु तात्काळ दुसरी बोट आली आणि त्यांनी आम्हाला मदत केली. या प्रसंगानंतर मला जीवनाचा खरा अर्थ समजला.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT