नवी दिल्ली: पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला IPL-2022 मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मोसमातील 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. पृथ्वी शॉच्या अर्धशतकानंतरही दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 149 धावा करता आल्या. यानंतर लखनौने 2 चेंडू राखून 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत खूपच निराश दिसला आणि तो फलंदाजांवर संतापला. (In the second defeat of Delhi Capitals in ipl 2022 captain Rishabh Pant erupted)
दिल्लीकडून पृथ्वी शॉने 34 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत (Captain Rishabh Pant) 39 आणि सर्फराज खानने 36 धावा करून नाबाद माघारी परतला. दोघांनीही 75 धावांची नाबाद भागीदारी केली मात्र संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लखनौचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 80 धावांची खेळी करत सामना (IPL 2022) पूर्णपणे आपल्या संघाकडे वळवला. आयुष बडोनीने विजयी षटकार ठोकला. सामनावीर ठरलेल्या डी कॉकने 52 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
सामन्यानंतर कर्णधार पंत म्हणाला, 'जेव्हा दव असे असते तेव्हा तुम्ही तक्रार करू शकत नाही. बॅटिंग युनिट म्हणून आम्ही 10-15 कमी होतो, शेवटी आवेश खान आणि जेसन होल्डरने पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, याचे श्रेय त्यांना आहे.
तो पुढे म्हणाला, 'दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी संघाशी चर्चा झाली. आम्ही म्हणालो की सामन्याच्या 40 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आम्हाला 100 टक्के द्यावे लागतील, मग निकाल काहीही लागला तरी. पॉवरप्ले चांगला होता, आम्हाला एकही विकेट मिळाली नाही. आमच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली पण शेवटी आम्ही 10-15 धावा कमी होतो. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 4 गडी राखून पराभव करून मोसमाची सुरुवात केली. त्यानंतर त्याला गुजरात लायन्स आणि लखनौकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता 10 एप्रिलला त्याचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.