IPL 2022: 'बोलायचं होत एक अन् बोललो एक'; वीरेंद्र सेहवागने सुधारली चूक

कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्ससाठी बोलताना त्याने मोठी चूक केली.
Pat Cummins
Pat CumminsDainik Gomantak

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्याच्या बुद्धी आणि वक्तृत्वासाठी कायमचं ओळखला जातो. सोशल मीडियावरही त्यांची मते चाहत्यांची लक्ष वेधून घेतात. पण, कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) खेळाडू पॅट कमिन्ससाठी बोलताना त्याने मोठी चूक केली. लवकरच त्यांनी आपली चूक सुधारली ही वेगळी गोष्ट. पण, सेहवाग सोशल मीडियावर (Social Media) जे काही बोलतो किंवा लिहितो ते त्याच्या चाहत्यांच्या नजरेतून कधीही सुटत नाही. तसे, पॅट कमिन्सच्या बाबतीत, एक गोष्ट घडली की सेहवागने जी दुरुस्ती केली, ती त्याने केवळ ट्विटमध्येच ठेवली नाहीये, तर त्याने केलेली चूक देखील हटवली गेली नाहीये. (Virender Sehwag apologizes for mistake in kkr vs mi match)

Pat Cummins
KKR: कोलकाताच्या पॅट कमिन्सने ठोकले IPL मधील सर्वात जलद अर्धशतक

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यानंतर सेहवागने पॅट कमिन्सबद्दल ट्विट केले होते. सेहवागला हे ट्विट करण्याची गरज का पडली? त्यामुळे सेहवागचे हे ट्विट करण्यामागचे कारण म्हणजे या सामन्यातील पॅट कमिन्सची कामगिरी, ज्याने मुंबई इंडियन्सचा IPL 2022 मध्ये सलग तिसरा पराभव केला आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध पॅट कमिन्सचा उडाला धुव्वा

पॅट कमिन्सने (Pat Cummins) मुंबई इंडियन्सविरुद्ध 15 चेंडूत 56 धावांची नाबाद आणि स्फोटक खेळी खेळताना सर्वांनी पाहिली. 373 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळलेल्या या डावात फक्त 4 चौकार होते आणि 6 षटकारांचा समावेश होता. कमिन्सने 19 मिनिटांत एवढा धुमाकूळ घातला की, संपूर्ण दृश्य मुंबई इंडियन्सचा पराभवातून आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात कधी बदलले, ते कळलेच नाही.

Pat Cummins
कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का, पाच बॉलमध्ये दाखवून दिली पोलार्डची पावर

सेहवागचे ट्विट, चूक आणि सुधारणा!

पॅट कमिन्सची ही खेळीमधील उग्र वृत्ती पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याच्याकडून एक चूक झाली, आणि माफी मागितल्यानंतर त्यांनी आपली चूकही सुधारली. त्यांनी आधी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की- त्याच्या तोंडातून हिसकावून घेतला. मग त्याने मुंबईच्या टीमचा विचार करत सॉरी म्हणाला.

सेहवागने त्याच्या ट्विटच्या शेवटी रोहितच्या चाहत्यांसाठी एक संदेश देखील सोडला आणि तो होता की- "धन्यवाद, तुम्ही रोहित शर्माच्या फलंदाजीचे जितके मोठे चाहते आहात, तितकाच मी ही आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com