जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा न्यूझीलंडचा खेळाडू काईल जेमिसन. 
क्रीडा

WTC Final: अंतिम सत्रात मी बराचवेळ बाथरूममध्येच लपलो: काईल जेमिसन

१३९ धावांचे लक्ष्य दिसताना माफक दिसत होते. पण आम्ही सलामीचे दोन फलंदाज गमाविल्याने भारतासाठी एक संधी होती. भारतीय चहाते देखील प्रत्येक चेंडूवर भारतीय संघाला पाठिंबा देत होते.

दैनिक गोमन्तक

जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम (WTC Final) सामना न्यूझीलंडने (New Zealand) 8 गडी राखून जिंकला या सामन्यात अष्टपैलू कामगिरी (All-round performance) करणाऱ्या न्यूझीलंडचा खेळाडू काईल जेमिसनने (Kyle Jamieson) शेवटच्या सत्रात न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती होती ते सांगितले आहे.

काईल जेमिसन म्हणाला, १३९ धावांचे लक्ष्य दिसताना माफक दिसत होते. पण आम्ही सलामीचे फलंदाज गमाविल्याने भारतासाठी एक संधी होती. मैदानातील भारतीय चहाते देखील प्रत्येक चेंडूवर भारतीय संघाला पाठिंबा देत होते. मी हा सामना ड्रेसिंग रुममधील टीव्हीवर पाहत होतो. तेथे रिअल टाईम अ‍ॅक्शनपेक्षा एक बॉल उशीराने दिसतो. यामुळे मला फार अडचणीचा सामना करावा लागला. आम्ही ड्रेसिंगरुममध्ये टीव्ही समोर बसलो होतो. प्रत्येक बॉलवर भारतीय चहाते उभे राहून भारताला असे चेअर करत होते, ज्यामुळे आम्हाला असे वाटायचे फलंदाज बाद झाला पण प्रत्यक्षात तो चेंडू त्या फलंदाजाने खेळून काढलेला असायचा किंवा त्यावर एक धाव निघालेली असायची.

पण हे पहाणे खूप कठीण होते. मी तर बराचवेळ बाथरूममध्ये लपलो होते. तेथे तरी काहीवेळ शांतता मिळेल असे वाटले होते. त्यावेळी आम्ही खूप निराश झालो होतो. पण केन आणि रॉस या दोन्ही महान फलंदाजांनी त्यावेळी शांत डोक्याने खेळ करत आमची निराशा दूर करत संघाला विजय मिळवून दिला. यात रॉस टेलरने 47 तर केन विल्यमसनने 52 धावा केल्या आणि न्यूझीलंड प्रथमच कसोटीतील विश्वविजेता बनला.

ड्रेसिंग रूममध्ये सर्वांसोबत सामन्याचा आनंद घेणे खूप छान होते. विजयाचा आनंद आम्ही सर्वांनी एकत्र रुममध्येच साजरा केला. कोरोनाच्या परिस्थितीमुळे बाहेर पडणे शक्य नव्हते. पण बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर आम्हाला त्याचे फळ मिळाले आहे. असे काईल जेमिसनने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT