नवी दिल्ली : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता भारतीय संघावर आणि व्यवस्थापनावर टीकेची झोड उठत आहे. निवडसमितीचे माजी अध्यक्ष गगन खोडा (Gagan Khoda, former chairman of the selection committee) यांनी भारताचा पराभाव चूकीची प्लेइंग इलेव्हन खेळविल्यानेच झाला आहे. अंतिम सामन्यात भारताने सलामीला शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना खेळविले. यात रोहितची जागा फिक्स होती, पण शुभमन गिलच्या जागी मयंकला खेळवायला हवे होते. त्याने डब्ल्यूटीसी स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये तो अपयशी ठरला होता. त्यावेळी शुभमन गिलने मिळालेल्या संधीचा फयदा घेत ऑस्ट्रेलियात जबरदस्त कामगिरी करत २ अर्धशतके केली. यालाच डोक्यात ठेऊन सातत्य राखण्याच्या नादात गिलला अंतिम सामन्यात संधी मिळाली. पण यावेळी तो फ्लॉप ठरला. असे खोडा यांनी स्पष्ट केले.
शुभमन गिल हा सलामीचा फलंदाज असला तरी तो व्हिव्हिएस लक्ष्मण सारखा आहे. त्यामुळे तो मधल्या फळीत देखील फलंदाजी करु शकतो. मयंक आणि रोहित यांनी सलामीला फलंदाजी करायला हवी होती. मयंक केवळ दोन सामन्यात खराब फलंदाजी केली, तर पृथ्वी शॉला केवळ एका सामन्यात खेळण्यास अपयश आले तरी त्याला संघाच्या बाहेर केले.
तर ऑलराउंडर रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यावरुन गगन खोडा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अंतिम सामन्यातील विकेटही जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल होती. तरी भारताने या सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांना का खेळविले. जडेजाच्या जागेवर एका फलंदाजाला किंवा शार्दुल ठाकुरला खेळविण्यास हवे होते. कारण शार्दुल हा गोलंदाजी बरोबर फलंदाजीत देखील आपले योगदान देऊ शकला असता. असे गगन खोडाने नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.